तालुक्यातील सांगवी गावात ग्रामदैवताची यात्रेला सुरुवात




तालुक्यातील सांगवी गावात ग्रामदैवताची यात्रेला सुरुवात


शिरपूर -सांगवी येथील ग्रामदैवत आनंदा मातेच्या यात्रेला परिसरातील नागरिकांनी हजारोच्या संखेने हजेरी लावली. मातेच्या दर्शन व नवसपूसाठी हजारो भाविकांनी रात्री उशिरापर्यंत एकच गर्दी केली होती. यात्रोउत्सवात लाखो रुपयांची उलाढाल झाली.
शिरपूर तालुक्यातील सांगवी गावाची ग्रामदैवत असलेल्या आनंदा मातेची यात्रेउत्सव आदिवासी भागातील ही एकमेव मोठी यात्रा आहे. दोन दिवस चालनारी हि यात्रा बुधवार (ता. 4) डीसेंबर पासून आरुणावती नदी पात्रात बरते. पंचायत समिती सदस्या प्रभाताई शिरसाट, सरपंच कनिलाल पावरा, उपसरपंच अरुणाबाई कोळी यांच्या हस्ते ग्रामदैवत आनंदा मातेची पूजा सकाळी सातला करण्यात आली. यात्रेनिमित्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवसाला पावणारी देवी म्हणुन ख्याती असल्याने भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात. यात्रेत लहान मोठे व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती. त्यात संसारपयोगी वस्तु, प्रसाधनाची दुकाने, विविध प्रकारचे पाळणे, नारळ पुजा साहित्य विक्रेते, खेळणी दुकाने, हॉटेल व्यावसायिक अशा विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती. या खरेदी विक्रीतून दोन दिवसात लाखो रुपयाची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या वर्षी तगतराव फीरवण्याचा मान आनंदा बंजारा यांना मिळाला. तगतरावाची मिरवणूक दुपारी तीन वाजेपासून जुनी सांगवी येथील हनुमान मंदिरा पासून मिरवणूकीची सुरुवात झाली. त्यानंतर आंनंदा मातेच्या मंदिराला पाच फेऱ्या मारुन गावाच्या सुख शांतीसाठी साखळे घातले. हजारो भाविकांनी याचा आनंद घेतला. यात्रेसाठी येण्याऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यात्रा समिती कडून मदतकार्य सुरु होते. रात्रीच्या मनोरंजनासाठी भिका भीमा यांचे चिंरजीव राजेश गणेश सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशा ठेवण्यात आला होता. यात्रेत काही अप्रीय घटना घडु नये म्हणून शिरपूर तालुका सांगवी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने