नंदुरबार मतदार संघात अपक्ष उमेदवार रवींद्र वळवी यांना विजयाचा विश्वास
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - सुमित गीरासे
नंदुरबार विधानसभा 03 विधानसभा मतदारसंघात विधानसभेची रणधुमाळी सुरू असून या निवडणुकीत राजकीय पक्षांसोबत काही अपक्ष उमेदवार आपले उमेदवारी करत आहेत. आणि त्यांना देखील या निवडणुकीत आपला विजयाचा विश्वास आहे.
असेच एक अपक्ष उमेदवार आहेत रवींद्र रंजीत वळवी. हे एक सुशिक्षित उमेदवार असून त्यांचे
शिक्षण BA झाले आहे. प्रशासकीय सेवेत ग्रामसेवक संघटना १० वर्षे जिल्हाध्यक्ष राज्यस्तरीय आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासन / राज्यपालाकडून सन्मानित करण्यात आले आहे. ग्रामविकास अधिकारी पदावरून ७ वर्षे सेवा बाकी असताना स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते आता समाजकारण करण्यासाठी राजकारणात उतरले आहेत.
यापूर्वीच त्यांनी शेतकरी युवा संवाद यात्रा काढून एकुण ६५ गावातील लोकांच्या सुख दुःख अडीअडचणी जाणून घेतल्या या मतदारसंघात ५४% खुला मतदार हा शेतकरी असून जवळच तापीचे पाणी असून देखील कोरडवाहू शेती करतो. नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस असे आसमानी संकटामुळे अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांना जीव गमावा लागला आहे. तापी बुराई प्रकल्पावर फक्त आश्वासन व राजकारण करण्यात आले. हा प्रकल्प फक्त प्रमा आदेशवर जिवंत आहे प्रकल्पाला पूर्णविराम देऊन शेतकरी राजाला राजा बनवणे व भविष्यातील आत्महत्या थांबवणे. तसेच शाहू भागात राहणारे आदिवासी हे भूमीहीन शेतमजूर असून त्यांना शासनाकडून जमीन मिळवून देणे. रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे आरोग्य शिक्षण सुविधा व पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून न्याय देणे. मतदारसंघातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संध्या निर्माण करून देण्यासाठी एमआयडीसीचा रखडलेला प्रकल्प पूर्ण करणे असे अनेक महत्त्वाचे विषय विषयांवर मला लोकसभेसाठी काम करायचे आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून तालुक्यातील ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे असे मत त्यांनी मांडले आहे.
नंदुरबार मधील प्रस्तापित राजकारणी व्यतीरीक्त स्वतंत्र विचारसरणीचा स्वतंत्र उमेदवार. आपला हक्काचा जनसामान्याचा बुलंद आवाज म्हणून उमेदवारी करीत आहे. फक्त आरोग्य शिक्षण. रोजगार विकास नंदुरबार विधानसभेचा रचनात्मक विकास हेच माझे ध्येय आहे असं देखील त्यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले आहे.
त्यामुळे मतदार राजा सुज्ञ असून आता कोणत्याही राजकारण्यांच्या दबावाला बळी न पडता ते मला निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
