शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या कारवाईत प्रतिबंधित सुगंधी तंबाखूच्या साठा जप्त
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुका पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधी तंबाखूच्या साठ्यावर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक 08/11/2024 रोजी रात्री 23.30 वाजेच्या सुमारास पो.नि. जयपाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळाली को, वाहन क्रमांक आर.जे. 14 जी.एन. 4422 मध्ये प्रतिबंधीत सुंगधी तंबाखु मध्यप्रदेश राज्यातुन महाराष्ट्र राज्यात येत आहे. यावरुन पोहेकाँ/संतोष पाटील, पोकाँ/ स्वप्नील बांगर, पोकाँ/ मनोज नेरकर यांना सदर संशयित वाहनाचा शोध घेवून कारवाई करण्याचे आदेशित केल्याने त्यांना सदर वाहन सिमा तपासणी नाका येथे दिनांक 09/11/2024 रोजी रात्री 00.30 वाजेच्या सुमारास सदरचे वाहन मिळुन आले. वाहनावरील चालकास त्याचे नांवगांव विचारले असता त्याने त्याचे नांव अन्वर शरीफ खान वय 24 वर्षे व्यवसाय चालक रा. बेडोज ता.रामगड जि. अलवर, राजस्थान राज्य असे सांगितले. सदर वाहन चालकास वरील नमुद वाहनात भरलेल्या माला बाबत विचारपुस करता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली म्हणून कंटनेर क्रमांक आर.जे.14 जी.एन. 4422 हे पोलीस ठाणेचे परिसरात आणुल लावले होते.
आज दिनांक 09/11/2024 रोजी पोलीस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, दोन पंचाना बोलावून तसेच टी.सी.आय कंपनीचे प्रतिनिधी यांचे समक्ष कंटनेर चे सिल तोडुन कंटनेर उघडुन पाहिले असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेली सुंगधीत तंबाखु मिळुन आली. यावरुन पोलीस स्टेशनला श्री. आनंद भाऊराव पवार, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन (म.रा.) धुळे यांनी फिर्याद दाखल केली असुन तपास पोसई मिलींद पवार हे करीत आहेत. सदर गुन्हयात खालील प्रमाणे मुददेमाल जप्त केला आहे.
1) 5,60,000/- रुपये किंमतीची सुंगधीत तंबाखु (प्लॉस्टीकच्या वँग मध्ये कोणतेही नांव नसलेले) एकुण 14 खोके प्रत्येक खोक्यात 5 किलो वजनाच्या 08 प्लॉस्टीक बँग एका प्लॉस्टीक बँगची किमंत 5000/- रुपये प्रमाणे (
किमंत अंदाजित)
2) 10,00,000/- रुपये किमंतीची एक आयशर कंपनीचा कंटनेर क्रमांक आर.जे. 14 जी.एन. 4422 (कि.अं. जु.वा.) एकुण 15,60,000/- रुपये ज्या मध्यमान जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक धुळे, श्री श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपुर, श्री. सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे, पोसई मिलींद पवार, ग्रेडपोसई जयराज शिंदे, पोहेकॉ/ संतोष पाटील, पोहेकॉ/संदिप ठाकरे, पोहेकाँ/ राजु ढिसले, पोकाँ/ योगेश मोरे, पोकाँ/ संजय भोई, पोकाँ/ स्वप्नील बांगर, पोकाँ/ जयेश मोरे, पोकाँ/सुनिल पवार, पोकाँ/ मनोज नेरकर, पोकाँ/ भुषण पाटील, चापोहेकॉ / अलताफ मिर्झा यांनी केली.
