*महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024*
*मतदान माहिती चिठ्ठी वाटप सुरू,*
*न मिळालेल्यांनी बीएलओंशी संपर्क साधावा*
*- उप जिल्हा निवडणुक अधिकारी गंगाराम तळपाडे*
धुळे, दिनांक 18 नोव्हेंबर, 2024 (जिमाका वृत्त) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात एकूण 1753 मतदान केंद्रे असून 18 लाख 19 हजार 135 इतके मतदार आहेत. या सर्व मतदारांच्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत मतदान माहिती चिट्ठी (Voter Slip) चे वाटपाचे कामकाज सुरु असून सरासरी 95 टक्के मतदान माहिती चिठ्ठीचे वाटप झाले आहे. ज्या मतदारांना अद्याप मतदान माहिती चिठ्ठी प्राप्त झालेली नाही, त्यांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून मतदान माहिती चिठ्ठी प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे यांनी केले आहे.
धुळे जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान माहिती चिठ्ठी प्राप्त करून घ्यावी व दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबधित मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा. तसेच याबाबत सर्व मतदारांनी व राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. तळपाडे यांनी केले आहे.
00000
