सिनेस्टाईल पाठलाग करुन KIA वाहनासह 12 लाखाचा विमल गुटखा जप्त शहादा पोलीस ठाण्याची धडक कारवाई. नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे



सिनेस्टाईल पाठलाग करुन KIA वाहनासह 12 लाखाचा विमल गुटखा जप्त 

शहादा पोलीस ठाण्याची धडक कारवाई.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे

दिनांक 15/11/2024 रोजी खेतिया (मध्यप्रदेश) येथून शहादा येथे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला विमल पान मसाला व V-1 सुगंधी तंबाखूची अवैध वाहतुक होणार आहे बाबत मा. पोलीस अधीक्षक, श्री. श्रवण दत्त एस. यांना गुप्त माहिती मिळाली होती. सदरची माहिती त्यांनी शहादा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सपोनि / राजन मोरे यांना कळवुन कारवाई करणेबाबत आदेशित केले. त्यावरुन मा. प्रभारी अधिकारी श्री. राजन मोरे यांनी पोउपनि / भुनेश मराठे, असई / प्रदीपसिंग राजपुत, पोह/ योगेश थोरात, पोना/ देविदास विसपुते, पोशि/ दिनकर चव्हाण, पोशि/ विकास शिरसाठ, पोशि/भरत उगले, पोशि/ युवराज राठोड, मपोशि/ शिला गावित अशांना पोलीस ठाण्यात बोलावुन बातमीची हकिकत सांगुन व योग्य ते मार्गदर्शन करुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन रवाना केले.

त्यावरुन वरील पोलीस स्टाफ असे खाजगी वाहनाने भाऊतात्या पेट्रोलपंप डोंगरगांव चौफुली जवळ येवून दबा धरुन बसले असतांना एक संशयीत पांढरे रंगाचे चारचाकी KIA कंपनीचे विना क्रमांकाचे वाहन खेतियाकडुन शहादा कडे भरधाव वेगाने येतांना दिसले सदर पथकाने त्यास हाताचा इशारा देवुन थांबविण्याचा इशारा केला असता सदरचे नमुद वाहन हे न थांबता भरधाव वेगाने नवीन बसस्टैंड कडे निघुन गेले त्यावेळी संशय बळावल्याने पथकाने त्यांचे वाहनाने सदर वाहनाचा पाठलाग सुरु केला असता सदरचे वाहन हे गोकर्ण महादेव मंदीराजवळ असलेल्या रोडने साईबाबा नगर, सप्तश्रृंगी माता मंदीर शहादा दोंडाईचा रोडवर येवुन तेथून बस स्थानक शहादा, डोंगरगांव रोड मार्गे जात असतांना सदर वाहनाचा पाठलाग करुन पटेल रेसीडेन्सी चौकातून नमूद वाहन हे स्वामी समर्थ मंदीरकडील रोडने जात असतांना सदर वाहनास ओव्हरटेक करुन सेंट्रल बँक समोर वाहन

आडवे लावून सदरचे वाहन थांबविले सदर वाहनास पाठीमागील नंबर प्लेटवर MH 18 BR 1453 असा क्रमांक दिसुन आला. त्यानंतर सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला विमल पान मसाला व सुगंधी तंबाखु (गुटखा) मिळुन आल्याने सदरचे वाहन त्यात असलेल्या मालासह पोलीस ठाणे येथे आणुन पंचासमक्ष वाहनावरील चालकास त्याचे नांव गाव पत्ता विचारता त्याने आपले नांव 1) अरविंद गोविंद पाटील वय 36 वर्षे, धंदा ड्रायव्हर रा. बेहेड्या ता. पानसेमल जि. बडवाणी (म.प्र.) असे सांगितले त्याचे सोबत असलेल्या इतर 2 इसमांना नांव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नांव 2) सुरेश भाईदास पाटील वय 32 वर्षे, धंदा मजुरी रा. बेहेड्या ता. पानसेमल जि. बडवाणी (म.प्र.) 3) आशिष मनोज पारख वय 27 वर्षे, धंदा व्यापार रा. अशोका रोड, खेतिया ता. पानसेमल जि. बडवाणी (म.प्र.) असे सांगितले. त्यांचे कब्जात 2.31,437/- (दोन लाख एकतीस हजार चारशे सदोतीस) रुपये रकमेचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला विमल पान मसाला व सुगंधी तंबाखु (गुटखा) तसेच सदरचा गुटखा वाहतुक करण्यासाठी वापरण्यात आलेले 9,25,000/- (नऊ लाख पंचवीस हजार) रुपये किमतीचे एक पांढऱ्या रंगाचे KIA कंपनीचे MH 18 BR 1453 असा दिसता क्रमांक असलेले चारचाकी वाहन व 47000/- (सत्तेचाळीस हजार) रुपये रकमेचे दोन मोबाईल फोन असा एकुण 12,03,437/- (बारा लाख तीन हजार चारशे सदोतीस) रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन शहादा पोलीस ठाण्यास पोह/ योगेश थोरात यांचे फिर्याद वरुन वर नमूद आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि/श्री. भुनेश मराठे

करित आहेत. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा भाग शहादा श्री. दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / श्री. राजन मोरे, पोउपनि/श्री. भुनेश मराठे, असई / प्रदीपसिंग राजपुत, पोह/योगेश थोरात, पोह/घनशाम सुर्यवंशी, पोना/ देविदास विसपुते, पोशि/ दिनकर चव्हाण, पोशि/ विकास शिरसाठ, पोशि/भरत उगले, पोशि/ युवराज राठोड, मपोशि/849 शिला गावित यांचे पथकाने केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने