शहादा येथे माहिती अधिकार महासंघ च्या सभासद नोंदणीला नागरिकांचा उत्सपूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी :- ता.शहादा येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ च्या वतीने माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला यावेळी संघा तर्फे मोफत सभासद नोंदणी अभियान राबवण्यात आले
28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिवस म्हणू साजरा करावा अशे महाराष्ट्र शासनाचे पत्रक असून तो प्रत्येक शासकीय कार्यालयात साजरा करणे बंधन कारक आहे 28 व 29 सप्टेंबर या दिवशी शासकीय सुटी असल्याने सोमवारी शहादा येथे उपविभागीय कार्यालय च्या आवारात महासंघा तर्फे माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला यावेळी सुरुवातीला भारतमाता व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुषपहर अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या वेळी कार्यक्रमाचे प्रमुखपाहुणे म्हणून शहादा उपविभागीय अधिकारी सुभाष दडवी व शहादा तहसीलदात दीपक गिरासे हे उपस्थित होते यावेळी नंदुरबार जिल्हाध्यक्ष, राजू शिंदे यांनी उपस्थित नागरिकांना माहिती अधिकार विषयी माहिती दिली सदर कार्यक्रमाला शहादा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी भेटदिली असून शुभेच्छा दिल्या यावेळी राज्य कमिटी सदस्य शरद मराठे, संजय पराडके, उदेसिंग पराडके धडगाव , मनिषा गोसावी, घनश्याम सोनवणे, दिलीप पवार, कृष्णा कोळी, सुमित गिरासे, आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते
