तालुक्यातील धवळी विहीर गावाला डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांची भेट, प्रशासनाकडे करणार चौकशीची मागणी
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील तधवळी विहीर गावाला व परिसराला डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनु भेट देऊन या परिसराची पाहणी करत ग्रामस्थांना धीर दिला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीची माहिती घेऊन याबाबत सखोल चौकशीसाठी जिल्हा प्रशासनाकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिरपूर तालुक्यातील धवळी विहीर आणि परिसरात जमिनीच्या पोटातून स्फोटासारखे आवाज येत आहेत. 2022 मध्येही असा प्रकार घडला होता व आताही घडत आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार करून देखील अद्याप याबाबत प्रशासनाने यावर कोणत्याही खुलासा केलेला नाही. मात्र असे आवाज होण्याच्या प्रमाणात सध्या वाढ झाल्याने या परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. याबद्दलची माहिती घेण्यासाठी आणि या परिसरातील गावकऱ्यांना भेट देण्यासाठी आज धवळी विहीर येथे आज डॉ जितेंद्र ठाकूर यांनी प्रत्यक्ष जाऊन भेट दिली.
दोन वर्षापूर्वी पासून शिरपूर तालुक्यातील धवळीविहीर व परिसरात जमिनीच्या भुगर्भातून स्फोट सद्रृष्य आवाज येत आहेत.गेल्यावर्षी या आवाजाची तिव्रता कमी होती मात्र यावर्षी आवाजात तिव्रता वाढली आहे.आज दि ३० रोजी डॉ जितेंद्र ठाकूर यांनी धवळीविहीर येथे भेट दिली.यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करतांना ग्रामस्थांमध्ये भीती असल्याचे दिसून आल्याने डॉ जितेंद्र ठाकूर यांनी धीर दिला व सखोल माहिती घेतली.याबाबत भूशास्त्रज्ञांतर्फे प्राथमिक चौकशी करण्यात आली असून याकडे अद्याप दुर्लक्ष झाले आहे.
भूगर्भातील हालचालींमुळे असा परिणाम होत असल्याची शक्यता आहे. मात्र तरीही ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी या प्रकाराची सक्षम भूशास्त्रज्ञांमार्फत चौकशी करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून करणार असल्याचे डॉ जितेंद्र ठाकूर यांनी केले असून दुर्दैवाने अशा गंभीर घटना होत असलेल्या प्रकरणाकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीने भेट देऊन दिलासा दिलेला नाही हे खेदजनक असल्याचे यावेळी डॉ जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.
त्यामुळे संकट काळात या परिसरातील लोकांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना लोकप्रतिनिधींनी आधार देणे गरजेचे आहे मात्र सध्या त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
तरी जिल्हा प्रशासनाने तांत्रिक कारणांच्या शोध घेऊन सखोल चौकशी करून या परिसरातील नागरिकांना मार्गदर्शन करून याबाबत योग्य तो खुलासा करून त्यांच्या मनातील भीती दूर करण्याच्या प्रयत्न केला गेला पाहिजे असे मत या परिसरातून व्यक्त होत आहे.




