माझ्या पक्ष फक्त भारतीय जनता पार्टी -आमदार राजेश पाडवी
शहादा प्रतिनिधी सुमित गिरासे
शहादा तळोदा विभागाचे विधान सभा सदस्य यांनी एक पत्रक जारी करून जनहितार्थ माहिती प्रसारित केली आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की,माझ्या सामाजिक राजकीय जन्म भारतीय जनता पक्षात झाला असून परिसरामध्ये विकासाची नांदी करण्याचे ध्येय घेऊन नियमित प्रेरित होतो.
प्रशासकीय अधिकारी असताना नेहमीच सामाजिक कार्याच्या माध्यमातून बदल घडविण्यासाठी राजकीय शक्तीसोबत असावे लागते म्हणून भारतीय जनता पक्षाची राष्ट्राप्रति,विश्वाप्रती असणारी सखोल विचारधारा मला नेहमीच आवडत राहिली आहे म्हणून मी देव,देश,धर्माच्या कार्यासाठी या विचारधारेचा पूर्वीपासून अनुयायी आहे व यापुढे देखील याच प्रमाणे नियमित राहील यात तीळ मात्र शंका नाही.
मागील काही दिवसांपासून अन्य विचारधारेच्या पक्षाच्या संपर्कात आहे असे खोटे वातावरण विरोधकांच्या वतीने तयार करण्यात येत आहे.
परंतु मी ठरवलेल्या विकासाचा दृष्टिकोन मला स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिसतो या शासनाने जनतेसाठी केलेले धोरण कल्याणकारी आहे व मी त्याशी पूर्णपणे सहमत असल्यामुळे कुठेही जाऊन राजकीय बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये अथवा कोणताही अन्य पक्षाच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात मी नाही.
यामुळे कुणीही कोणत्याही अफवांना बळी पडण्याचे काहीही कारण नाही असे मला स्पष्टपणे सांगावेसे वाटते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रशासकीय सेवेतून एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रभारी केले पक्षाने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला मी त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.
आधी देश मग पक्ष आणि नंतर मी स्वतः या त्रिसूत्रीवर माझे काम सुरू आहे व नियमित सुरू राहील.
भारत माता की जय…
भारतीय जनता पार्टी जिंदाबाद …
