*शहादा शहरातील शासकीय विश्रामगृहाची कर्मचार्यांची दैनंदिन कामाबद्दलची देखरेखीची चौकशी व्हावी – मनसे चे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम, शहादा यांना निवेदन.*
प्रतिनिधी सुमित गिरासे शहादा
शहादा शहरातील शासकीय विश्रामगृह बे-भरोसे असल्याचे चित्र वारंवार दिसत असल्यामुळे विश्रामगृहासाठी नेमलेले कर्मचारी कामावर दिसून येत नाही त्यांच्या मनमानी कारभार चालू आहे,ते धुमकेतू प्रमाणे प्रकट होवून अदृश्य हि होतात तसेच विविध सामाजिक व राजकीय पदाधिकारी आले की ते आरेराविची भाषा वापरतात तरी असले मुजोर कर्मचारी इतर वेळी मात्र रिकाम्या लोकांसाठी नशेचा अड्डा म्हणून विश्रामगृह उपलब्ध करून देतात यांना हा अधिकार कोणी दिला ? हा मोठा प्रश्न उपस्थित होतो आता नुकतेच विश्राम गृहाची डागडुजी करण्यात आली आहे ते काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. येथे विश्रामगृहात सार्वजनिक मुतारीचे तीन तेरा वाजले आहे. कुठेही स्वच्छता दिसून येत नाही स्वच्छतेच्या नावाखाली मात्र लाखोची लुट केली जाते , कुठलीही सोय-सुविधा येथे नाही मग याला जबाबदार कोण... या सर्व प्रश्नांची उत्तरे सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावे, तरीदेखील उत्तर मिळत नसतील तर मग हे आपल्याच आशीर्वादाने सुरू आहे असे समजावे लागेल या सगळ्या कामांची चौकशी व्हायला हवी ही आमची मागणी आहे, येत्या ८ दिवसात चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी, व केलेल्या कारवाईची अहवाल आम्हाला प्राप्त करून द्यावा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल....
अशा आशयाचे निवेदन उप अभियंता सार्वजनिक बांधकाम शहादा यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष सुहास पाटील, योगेश सोनार, वाहतूक जिल्हासंघटक, रुपेश राजपूत, दीपक लोहार, रविकांत सांजेराय, आदी उपस्थित होते.
