गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर पोलीस ठाण्यात गणेश मंडळांची बैठक पोलीस प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना, मंडळांच्या अडचणी सोडवण्यावर चर्चा संपन्न




गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर पोलीस ठाण्यात गणेश मंडळांची बैठक 

पोलीस प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना,  मंडळांच्या अडचणी सोडवण्यावर चर्चा संपन्न 

शिरपूर प्रतिनिधी - आगामी काळात येणारा गणेश उत्सव निमित्ताने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली शहर पोलीस स्टेशन आणि शहरातील गणेश मंडळे त्यांचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांच्यात एक समन्वय बैठक संपन्न झाली. 



याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे, पोलीस निरीक्षक के.के.पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार, संदीप दरवडे व इतर पोलीस अधिकारी आणि विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी पोलीस प्रशासनाकडून गणेश मंडळांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. आणि गणेश मंडळासमोरील संभावित अडचणी सोडवण्यासाठी पुन्हा एकदा प्रशासनातील इतर सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन उपायोजना व अडचणी दूर करण्याबाबत चर्चा संपन्न झाली. 
यावेळेस पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी प्रशासनाची भूमिका मांडली. त्यात प्रामुख्याने प्रत्येक मंडळाने रीतसर परवानगी घ्यावी, यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने परवानगीसाठी सेवा उपलब्ध आहे, वर्गणी गोळा करताना कोणावरही जोर जबरदस्ती न करता सो इच्छेने वर्गणी घ्यावी, मोठ्या मंडळांनी धर्मदाय आयुक्त यांची देखील परवानगी घ्यावी, वाहतुकीस अडचण होईल अशा जागेवर गणपती मूर्तींची स्थापना करू नये, आपण ज्या जागेवर गणेशाची स्थापना करणार आहोत त्या जागेची परवानगी घ्यावी, संभावित पावसाची शक्यता लक्षात घेता वॉटरप्रूफ मंडपाची सोय करावी, आणि भटक्या प्राण्यांपासून मूर्तीची विटंबना होणार नाही यासाठी देखील मंडळांनी दक्षता घ्यावी, शक्य असेल तर प्रत्येक मंडळांनी सीसीटीव्ही लावून घ्यावेत, विजेचे अधिकृत कनेक्शन घ्यावे, लाइटिंग व्यवस्था करताना देखील चांगल्या प्रतीचे वायर्सच्या वापर करून अनुभवी तंत्रज्ञान कडून त्याची मांडणी करून घ्यावी, रात्रीच्या वेळी मंडळांनी काही सदस्यांची नेमणूक करून 24 तास देख रेख ठेवावी, पोलिसांकडून देखील प्रत्येक ठिकाणी कर्मचारी आणि होमगार्ड देण्याच्या प्रयत्न केला जाईल, शक्यतो प्रत्येकाने डीजेचा वापर न करता पारंपारिक वाद्यांच्या वापर करण्याचा प्रयत्न करावा, सर्वोच्च न्यायालयाने दिलेले ध्वनी प्रदूषणाचे नियम प्रत्येक मंडळांनी पाळावेत, गुलालाच्या वापर देखील पूजा विधी साठी  मर्यादित स्वरूपात करावा, त्याऐवजी फुलांच्या पाकळ्या वापरण्याच्या प्रयत्न करावा, फटाक्यांच्या कमीत कमी वापर करावा, किंवा कमी तीव्र त्याचे फटाके वापरावेत, पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था करावी, आपल्या वर्तनाने कोणत्याही इतर धर्मीय लोकांचे भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी, शक्यतोवर मोठ्या मूर्तींची स्थापना न करता सुंदर आकर्षक आणि देखण्या मूर्तींची स्थापना करावी, आणि विसर्जन करते वेळी खबरदारी घ्यावी, अशा अनेक प्रकारच्या मार्गदर्शक सूचना यावेळेस पोलीस प्रशासनाने मंडळांना दिल्या. आणि मंडळाकडून संभावित अडचण यांच्या देखील आढावा घेऊन त्या सोडवण्याचे आश्वासन देखील प्रशासनाकडून देण्यात आले. यावेळेस उपस्थित मंडळांनी देखील शिरपूर शहर हे शांतता प्रिय आणि न्यायप्रिय शहर असून उत्सव काळात येथे कोणताही कायदा सुव्यवस्थेला बाधा होणार नाही आणि आनंदाने उत्साहात उत्सव साजरा करण्यात येईल अशी आश्वासन मंडळाकडून देण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने