जोयदा येथील अंगणवाडीच्या पडीत इमारतीच्या चौकशीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.




जोयदा येथील अंगणवाडीच्या पडीत इमारतीच्या चौकशीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

प्रतिनिधी, शिरपूर
             तालुक्यातील जोयदा येथे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत सन 2010-11 मधे बांधल्या गेलेल्या अपूर्णावस्थेतील आणि धोकेदायक अंगणवाडी इमारतीच्या चौकशीकडे तालुका प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष असल्याचे जाणवते. 15 एप्रील 2024 ला तक्रार करूनही अद्याप चौकशीच झाली नसल्याचे समोर आले आहे. 
               तालुक्यातील जोयदा येथे 2009-10 किंवा 2010-11 मधे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अंगणवाडी इमारतीचे बांधकाम सुरू झाले होते. मात्र सदर इमारत आजही अपूर्ण आणि अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. परंतु सदर इमारतीचे बील लाटले गेले असल्याच्या शक्यतेवरून सीईओ जिल्हा परिषद धुळे, महिला व बाल विकास सीईओ, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे दिनांक 15 एप्रील 2024 रोजी तक्रार केली गेली. त्यासंदर्भात जिल्हा स्तरावरून चौकशीचे आदेशही निघालेत. मात्र अद्याप चौकशीच झाली नाही. यावरून सरकारी निधीचा अपहार करणाऱ्यांवर कधी कारवाई होईल? याकडे तालुका वासियांचे लक्ष लागून आहे. तसेही तालुक्यात रस्ते, पूल चोरीला गेलेच होते. आता अंगणवाडीवरच डल्ला मारला गेला. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषिंवर पैसा वसूली आणि फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी तक्रारीतून केली गेली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने