भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जिल्हा कौन्सिल बैठक व किसान सभेच्या मेळावा संपन्न भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून शिरपूर विधानसभेची जागा लढवण्याची घोषणा




भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जिल्हा कौन्सिल बैठक व किसान सभेच्या मेळावा संपन्न 

भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून शिरपूर विधानसभेची जागा लढवण्याची घोषणा 





शिरपूर प्रतिनिधी -  शेतकरी आणि सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी देशातील अग्रगण्य पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष लवकरच आपले शंभर वर्षे पूर्ण करत आहे. 

दिनांक तीन ऑगस्ट रोजी क्रांतिसिंह नाना पाटील जयंती व  शाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरा करून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने व किसान सभेने मेळावा आयोजित केला होता. 
त्याच तालुका भरातील व जिल्हाभरातील किसान सभेचे व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सदस्य उपस्थित होते. शिरपूर शहरातील काँग्रेस भवन या कार्यालयात हा मेळावा संपन्न झाला. यात कार्यक्रमाची प्रस्तावना एडवोकेट हिरालाल परदेशी यांनी मांडले कार्यक्रमाला मार्गदर्शन संघटनेचे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले यांनी केले तर आभार प्रदर्शन एडवोकेट संतोष पाटील यांनी केले.

पक्षाच्या शंभर वर्षाच्या या संघर्षाच्या काळातील पक्षाची वाटचाल आणि मिळालेले यश आणि दिलेला लढा या सर्वांची नोंद घेत तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय आणि देश पातळीवरील घटनांची नोंद घेत पुस्तिका तयार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक
 भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्राचे सहसचिव प्राध्यापक कॉम्रेड राजू देसले तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य एडवोकेट हिरालाल परदेशी., धुळे जिल्हा सेक्रेटरी काॅ  वसंत पाटील,  , शिरपूर तालुका सेक्रेटरी एडवोकेट संतोष पाटील, शहर सेक्रेटरी  जितेंद्र देवरे. धुळे शहर  सेक्रेटरी
कॉम्रेड पोपटराव चौधरी,. राज्य कौन्सिल सदस्य कॉम्रेड साहेबराव पाटील., भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते  कॉम्रेड  अर्जुन दादा, कॉम्रेड शिलदार दादा, कॉम्रेड रामचंद पावरा कॉम्रेड सतीलाल रतन  पावरा ,कॉम्रेड नारसिग पावरा. काॅ. शिवाजीराव पाटील, कॉम्रेड नाना पाटील ,कॉम्रेड कैलास देसले कॉम्रेड काशीराम पाटील, कॉम्रेड कावा पावरा.काॅ.राहुल पावरा,काॅ.भरत सोनार ,अँड. सचिन  थोरात.तुळशीराम पाटील ,
तालुका सेक्रेटरी,भाकप, कॉम्रेड वसंत पाटील धुळे जिल्हा ,भा कप सेक्रेटरी,साहेबराव पाटील,कॉम्रेड सतीलाल पावरा, रामचंद पावरा, नाना पाटील  ,जिल्हा कौन्सिल सदस्य,कॉमेड ज्ञानेश्वर पाटील जळगाव, जिल्हा भाकप सेक्रेटरी, जितेंद्र देवरे,शहर सेक्रेटरी भाकप, एडवोकेट सचिन थोरात,,कॉम्रेड भरत सोनार, कॉम्रेड कवरलाल कोळी, कॉम्रेड शिवाजी पाटील, एडवोकेट एस बी पाटील,  सुरजमल जैन, तुळशीराम पाटील,गोरख वानखेडे, संजय बाशिंगे,कावा पावरा ,गुमान पावरा , अशा गटप्रवर्तक अरुणा सूर्यवंशी,मैराळे, आशा वर्कर स्मिता दोरीक  इ कार्यकर्तै  उपस्थित  होते.

यावेळी कॉम्रेड राजू देसले यांनी पक्षाची ध्येय धोरणे व आगामी काळातील आंदोलने याबाबत माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही इंडिया आघाडी सोबत मोलाची भूमिका निभावली आणि सर्वांच्या प्रयत्नांमुळे लोकांमध्ये जागृती येऊन महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांना प्रचंड मोठे अपयश आले. त्यामागे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे देखील मोलाची भूमिका होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मागील दोन वर्षांपूर्वीच देशात भाजप हटाव आणि देश बचाव अशी मोहीम सुरू केली होती. यासाठी देशभरात जनजागरण संघटनेमार्फत करण्यात आले होते. त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाला देखील काही जागांवर निवडणूक लढण्याची संधी द्यावी अशी मागणी आणि केली आहे. शिरपूर मतदारसंघ लढवण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष इच्छुक असून ही जागा लढवण्याची घोषणा आणि ठराव आजच्या बैठकीत करण्यात आला. यापूर्वी तीन दिवसांची राज्यस्तरीय बैठक नाशिक येथे संपन्न झाली आहे. जवळपास 15 जागा लढवण्याची आमची राज्यात तयारी आहे, या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या पराभव करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी आम्ही घडत असलेल्या जागे व्यतिरिक्त इतर ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीला साथ देणारा आहोत. सध्या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी धर्म आणि जातीपातीचे राजकारण करून विविध समाजात द्वेष निर्माण करत आहे. महाराष्ट्रात पेटलेल्या मराठा आंदोलनात ओबीसी विरुद्ध मराठा असा नवीन वाद निर्माण करून आंदोलनाच्या खेळ खंडोबा सरकारकडून केला जात आहे. त्यास आमच्या तीव्र विरोध आहे. त्यामुळे या देशात जर आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा वाढवण्यात आले तरच आरक्षणाच्या मुद्दा मार्गे निघू शकतो आणि या देशात जातिगत जनगणना होणे त्यासाठी गरजेचे आहे आणि या दोन मुद्द्यांसाठी पक्ष लढा देत आहे. हे सर्व केंद्र सरकारचे आत्ता देखील प्रश्न असून देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आमच्या पक्षाने 2018 मध्येच कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे ठराव यापूर्वीच पारित केला आहे. यापुढे एक ते वीस तारखेच्या आत आम्ही जिल्हा जिल्ह्यात जाऊन जात निहाय जनगणना होण्यासाठी एक परिषद आम्ही घेत आहोत. शिवाय शेतकऱ्याने कष्टकरांच्या मुख्य प्रश्नांसाठी 30 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन संघटनेमार्फत करण्यात येणार आहे. सरकार एका बाजूला लाडकी बहीण योजना जाहीर करून महिलांना पंधराशे रुपयांचे गाजर देत आहे तर दुसरीकडे मात्र कष्टकरी महिलांची अवहेलना होत आहे. अशा गटप्रवर्तक यांना कोणत्याही प्रकारचे मानधन दिले जात नाही त्यांना फक्त प्रवास भत्ता दिला जातो. अंगणवाडीच्या महिलांना त्यांच्या कामाच्या पूर्ण मोबदला दिला जात नाही. शासनाकडून दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात येत नाही. त्यामुळे कष्टकऱ्यांचे शोषण करणाऱ्या या सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत. अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने