*लोकसंचलित साधन केंद्राच्या सर्व कर्मचारी वर्ग असहकार आंदोलनात सहभागी..*
धुळे प्रतिनिधी.. महिला आर्थिक विकास महामंडळ संचलित धुळे जिल्ह्यातील पाच लोकसंचालित साधन केंद्र त्यात उन्नती, कल्पतरू, दिशा, आधार व प्रेरणा या सीएमआरसीतील सर्व कर्मचारी वर्ग त्यात व्यवस्थापक लेखापाल व संयोगिनी सर्व कर्मचारी आजपासून असहकार आंदोलनात सहभागी झाले आहेत या माहितीचे निवेदन मा. जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ धुळे यांना देण्यात आले.
महिला आर्थिक विकास महामंडळ महिला सक्षमीकरणाचे काम करणारे एक शिखर संस्था असून या संस्थांतर्गत महाराष्ट्रभर वेगवेगळ्या CMRC ची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच्यातील कर्मचारी वर्ग तुटपूजा मानधनावर काम करीत असून त्यांना मानधनासाठी गटांकडून वेगवेगळ्या पद्धतीने निधी संकलित करावा लागतो व त्या निधीमधून त्यांचे मानधन हे होत असते. या सर्व गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ कम्युनिटी मॅनेजमेंट रिसोर्स सेंटर कंत्राटी कर्मचारी संघ महाराष्ट्र संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्या आदेशान्वये मा. जिल्हा समन्वय अधिकारी यांना निवेदन सादर केले. निवेदनात पुढील प्रमाणे मागण्यांचे प्रत सोबत जोडलेली आहे. त्यात लोकसंचालित साधन केंद्रांना किमान 25 लक्ष निधी मिळावा. कर्मचाऱ्यांना किमान वेतन मानधनाची तरतूद व्हावी. माविम स्थापित गटांना फिरता निधी 30000 मिळावा . बचत गटांना सात टक्के व्याजदराने कर्ज मिळावे. सी आर पी यांना सहा हजार रुपये मानधन मिळावे. अशा मागण्यांचे निवेदन माननीय जिल्हा नियोजन अधिकारी यांना सादर जिल्हा नियोजन मां. जिल्हा समन्वय अधिकारी यांना सादर करण्यात आले. जोपर्यंत सदर मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत सीएमआरसीमार्फत कुठल्याही प्रकारचा रिपोर्ट जिल्हा कार्यालयास दिला जाणार नाही पण बचत गटाचे नुकसान होऊ नये म्हणून सर्व कर्मचारी बचत गटाचे नियमित काम करतील असे देखील याप्रसंगी नमूद करण्यात आले. याप्रसंगी व्यवस्थापक नाना साबळे,भूषण ब्राम्हणे, नीता बाविस्कर, ललिता माळी, दिपाली भदाने, लेखापाल अनिल शिरसाठ, प्रशांत बारी, स्नेहा सूर्यवंशी संयोगिनी मीना भामरे, पुनम दहिवदकर, सविता पावरा, अन्नपूर्णा सावंत, रत्ना पाटील, प्रियंका ठाकूर, संगीता ठाकरे,कल्पना माळी ,किरण पाटील, सरला सोनवणे ,सायरा पिंजारी ,शिल्पा चव्हाण, आशा जाधव छाया पाटील रबिता पावरा आशा गुरव इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रियंका ठाकूर व आशा गुरव म्हणाले की..

