दरोडा घालण्याचे पुर्वतयारीचे गुन्हयातील अटक २ आरोपीतांकडुन ०३ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस ,सोने व चांदीची लगड हस्तगत शिरपूर शहर पो.स्टे.चे डी.बी. पथकाची कामगिरी




दरोडा घालण्याचे पुर्वतयारीचे गुन्हयातील अटक २ आरोपीतांकडुन ०३ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस ,सोने व चांदीची लगड हस्तगत

शिरपूर शहर पो.स्टे.चे डी.बी. पथकाची कामगिरी


शिरपूर प्रतिनिधी -  शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने दरोडा घालण्याचे पुर्वतयारीचे गुन्हयातील अटक २ आरोपीतांकडुन ०३ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन एकुण ०३,३७,९५०/- रूपयांचा मुद्देमाल सोने व चांदीची लगड हस्तगत करून दाखल गुन्हे उघडकिस आणले आहेत.

शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं. ३२६/२०२४ भादंवि कलम ४५४.४५७,३८० प्रमाणे गुन्ह्यातील फिर्यादी प्रविण कृष्णा मोरे रा. प्लॉट नं. ३० ए श्री साई समर्थ नगर, ८० फुटी रोड शिरपूर जि. धुळे यांनी फिर्याद दिली की, दि.३१/०५/२०२४ रोजी २१.०० ते दि.०४/०६/२०२४ रोजी ०८.०० वाजेचे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे राहते घराचे पुढील दरवाजाचे लॅच लॉक अट लावुन तोडुन दरवाजा उघडून घरात प्रवेश करून घरातील बेडरूम मधील कपाट उघडुन कपाटातील ६१,०००/-रूपये किंमतीचे रोख रूपये, सोने-चांदीचे दागिने व टायटन कंपनीची मनगटी घड्याळ फिर्यादीचे संमतीशिवाय लवाडीचे इरादयाने चोरून नेले. सदर गुन्हयात शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं. ३५९/२०२४ भा.दं.वि. कलम ३९९,४०२ प्रमाणे गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी नामे- १) राजेंद्रसिंग ऊर्फ राजन प्रितमसिंग बरनाला वय-२६, २) ईश्वरसिंग नुरबिनसिंग चावला वय २३ दोन्ही रा.उमर्टी ता. वरला जि. बडवाणी राज्य-मध्य प्रदेश यांचा मा. न्यायालयाकडुन ताबा घेवुन त्यांना सखोल विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा तसेच शिरपुर शहर पो.स्टे. गुरनं. १८३/२०२४ भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे मांडळ शिवारात घडलेला गुन्हा केल्याची कबुली देवुन त्यातील चोरुन नेलेले सोन्या-चांदीचे दागिणे व चिजवस्तु चोपडा जि. जळगाव शहरातील मानक ज्वेलर्स सराफ दुकानदारास विक्री केल्याची कबुली दिल्याने वरील आरोपीतांसह चोपडा जि. जळगाव येथील मानक ज्वेलर्स येथे जावून सराफ दुकानदारास विचारपूस करता त्याने आरोपीतांना ओळखले व आरोपीतांनी त्यास दिलेले सोन्या-चांदीचे दागिण्यांची त्यांनी तयार करून ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या लगड हजर केल्याने त्या तपासकामी जप्त केल्या असुन त्यांचे वर्णन व किंमत खालील प्रमाणे,

१) ९०,०००/- रूपये किंमतीची २ तोळे वजनाची सोन्याची लगड किं. अं. शिरपुर शहर पो.स्टे. गुरनं. ३२६/२०२४ भादवि कलम ४५४,४५७, ३८० प्रमाणे गुन्हयातील सोन्याचे दागिण्याची

२) २५००/- रूपये किंमतीची १९.६०० ग्रॅम चांदीची लगड किं. अं. शिरपुर शहर पो.स्टे. गुरनं. ३२६/२०२४ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हयातील चांदीचे दागिणे व चिजवस्तुंची

३) २,४०,०००/- रूपये किंमतीची ५ तोळे वजनाची सोन्याची लगड किं. अं. (गुरनं. १८३/२०२४ भादवि कलम ४५४,४५७,३८०

प्रमाणे गुन्हयातील सोन्याचे दागिण्याची) ४) ०५,४४०/- रूपये किंमतीची २०० ग्रॅम चांदीची लगड किं. अं. (गुरनं. १८३/२०२४ भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हयातील चांदीचे दागिणे व चिजवस्तुंची)

एकुण ०३,३७,९५०/-रुपये किंमतीचे सोने व चांदीची लगड किं.अ.

वरील प्रमाणे आरोपीतांनी कबुली दिल्यावरून वरील गुन्ह्यांमधील मुद्देमाल हस्तगत केल्याने खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

१) शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं. १८३/२०२४ भादंवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे

२) शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं. ३२६/२०२४ भादंवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे

३) शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं. ३७०/२०२४ भादंवि कलम ४५७,३८० प्रमाणे

तसेच सदर आरोपीतांकडे मिळुन आलेल्या मो.सा. बाबत खात्री करता सदरची मो.सा.हि आरोपीतांनी भुसावळ जि. जळगाव शहरातुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले असुन त्याबाबत भुसावळ शहर पो.स्टे. गुरनं. १२८/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे.

तसेच वरील आरोपी हे घरफोडी चोरी करणारे सराईत आरोपी असुन त्यांचेविरूध्द धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात तसेच मध्य प्रदेश राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भागवत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील, पोउनि/हेमंत खैरणार, संदिप दरवडे, डी.बी. पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील, पोना/रविंद्र आखडमल, पोकों/विनोद आखडमल, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, प्रशांत पवार, भट् साळुंके, आरीफ तडवी, सचिन वाघ, मनोज महाजन व मनोज दाभाडे, चापोकों/रविंद्र महाले व चापोहेकॉ नासिर खान पठान अशांनी मिळून केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने