मोटर सायकल वर फिरण्याची होती हौस भारी पण करावी लागली आता जेलवारी शिरपूर येथील बँकेत चोरीच्या प्रयत्न करणाऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकास ४८ तासांचे आत शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने घेतले ताब्यात




मोटर सायकल वर फिरण्याची होती हौस भारी 
पण करावी लागली आता जेलवारी 

शिरपूर येथील बँकेत चोरीच्या प्रयत्न करणाऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकास ४८ तासांचे आत शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने घेतले ताब्यात 

शिरपूर प्रतिनिधी - आपणास मोटरसायकल घ्यायची आहे परंतु पैसे नाहीत मग करावे काय या विवंचनेत असणाऱ्या बालकाने अखेर बँकेत चोरी करण्याच्या डाव आखला आणि तसा प्रयत्नही केला मात्र तो असफल झाला आणि सदर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. शिरपूर शहर पो.स्टे.चे डी.बी. पथकाने मोठ्या शेतापींने आरोपीचा शोध घेऊन त्याला जर बंद केले आहे. 

शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं. ३८६/२०२४ भारतीय न्याय संहिता कायदा सन २०२३ चे कलम ३३०(४), ३०३(२) व ६२ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी हर्षल एकनाथ पाटील (बँक मॅनेजर) रा.पुणे ह.रा.शिरपूर जि.धुळे यांनी फिर्याद दिली की, दि.०१/०७/२०२४ रोजी रात्री ०२:४२ ते ०३:४१ वाजेच्या दरम्यान शिरपूर जि. धुळे शहरातील गुजराथी कॉम्प्लेक्स जवळील आर. के. कॉम्प्लेक्स मधील बँक ऑफ इंडिया येथे कोणीतरी अज्ञात चोरट्याने बँकेत चोरी करण्याचे उद्देशाने लोखंडी शटरला लावलेले कुलूप व शटरचे सेंटर लॉक लोखंडी कटरच्या सहाय्याने कापुन शटर उघडण्याचा व बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला बाबत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील यांनी तपासचक्रे वेगाने फिरवुन गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांमार्फत घटनास्थळ परिसरातील सी.सी.टि.व्ही फुटेज व गोपनिय बातमीदारामार्फत अज्ञात चोरट्याचा शोध घेत असतांना पारधीपूरा शिरपूर जि. धुळे येथील राहणारा विधी संघर्षग्रस्त बालकाने सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा शोध घेत असतांना त्यास पारधीपूरा येथुन शिताफीने ताब्यात घेवुन त्याने सदरचा गुन्हा करतेवेळी वापरलेले लोखंडी कटर हस्तगत करून सदरचा गुन्हा अवघ्या ४८ तासांचे आत उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या आरोपीस पोलिसांनी विचारपूस केली असता चोरीचे कारण त्याने आपणास मोटर सायकल घ्यायची होती, मात्र पैसे नव्हते, ती हौस पूर्ण करण्यासाठी आपण हा गुन्हा केला असल्याबाबत ची माहिती त्याने पोलिसांना दिली. 

सदरच्या गुन्हेगार हा सराईत गुन्हेगार नसल्याने व त्याच्या शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. मात्र उपलब्ध पुरावे सीसीटीव्ही फुटेज आणि फुटेज मधील त्याच्या मार्ग इत्यादी पुराव्यांची सांगड घालून पोलिसांनी या आरोपीचा शोध घेतला आणि हा गुन्हा उघडकीस आणला.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भागवत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री.के. के. पाटील, पोउनि/संदिप दरवडे, डी.बी. पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील, पोना/रविंद्र आखडमल, पोकों/मनोज महाजन, आरीफ तडवी, विनोद आखडमल, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, गोविंद कोळी, मनोज दाभाडे, भटु साळुंके व सचिन वाघ अशांनी मिळून केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने