माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी कागदपत्र जमवण्यासाठी महिलांची सेतू केंद्र तसेच शासकीय कार्यालयांपुढे गर्दी



शहादा प्रतिनिधी सुमित गिरासे 

माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी कागदपत्र  जमवण्यासाठी  महिलांची सेतू केंद्र तसेच शासकीय कार्यालयांपुढे गर्दी 


शहादा, ता.२ : महाराष्ट्र राज्यात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी कागदपत्र  जमवण्यासाठी  महिलांची सेतू केंद्र तसेच शासकीय कार्यालयांपुढे गर्दी होत आहे. यात शहरात  कागदपत्र घेण्यासाठी आलेली महिला चक्कर येऊन कोसळल्याने एकच गोंधळ उडाला.यावेळी उपस्थित  नागरिकांनी संबंधित महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

   प्राप्त माहितीनुसार, राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्य शासनाने २१ ते ६० वर्ष वयोगटातील विवाहित परितक्त्या विधवा महिलांसाठी सुरू केली आहे.या  योजनेसाठी लागणारे   कागदपत्र जुळवण्यासाठी शहरातील विविध शासकीय कार्यालय व सेतू केंद्र येथे मोठ्या प्रमाणावर महिलांच्या रांगा लागल्या आहेत. त्यातच शहरातील जुन्या तहसील कार्यालयात असलेल्या सेतू केंद्रात कागदपत्रांची जुळवा जुळव करण्यासाठी आलेल्या टेक भिलाटी येथील सीता योगेश ठाकरे  या महिलेला गर्दीत श्वास गुदमरल्याने चक्कर  आल्याने ती रस्त्यावर पडली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ त्या महिलेला रिक्षेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या योजनेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक खाते, रेशन कार्ड मध्ये महिलेचे नाव अंतर्भूत असावे अशी अशी अट असल्यामुळे आजपासून शहादा येथील शासकीय कार्यालय व सेतू केंद्रात  महिलांची व कुटुंबीयांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.योजनेसाठी दिलेला पंधरा दिवसांचा अवधी म्हणजेच एक जुलै ते १५ जुलै २०२४ पर्यंत नाव नोंदणी करावयाचे असल्यान शहरामध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. यावेळी शासनाकडून कागदपत्र जमवण्यासाठी जास्तीत जास्त अवधी देण्यात यावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

दरम्यान राज्यभरातील घडलेल्या घटनांच्या आढावा घेत राज्य सरकारने काल संध्याकाळी या योजनेच्या कालावधी दोन महिन्यांसाठी वाढवला असून काही कागदपत्रांची शिथिलता व नियमात देखील बदल केला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने