दादर -नंदुरबार गाडी भुसावळ पावेतो करावी अन्यथा आंदोलन - प्रविण महाजन सदस्य पश्चिम रेल्वे सल्लागार समिती मुंबई दोंडाईचा दोडाईचा (मुस्तूफा शाह)




दादर -नंदुरबार गाडी भुसावळ पावेतो करावी अन्यथा आंदोलन - प्रविण महाजन सदस्य पश्चिम रेल्वे सल्लागार समिती मुंबई 
दोंडाईचा
दोडाईचा (मुस्तूफा शाह)

 (दि.२/७/२०२४) तापी सेक्शनवरील प्रवाशांची प्रचंड मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने बांद्रा टर्मिनस व मुंबई सेंट्रल हुन सुटणारी भुसावळ खान्देश एक्स्प्रेस दादरहुन दि.५ जुलैपासून करीत असल्याचे जाहीर केले आहे हि सुखावह बाब आहे परंतु सदर गाडी मुंबईहुन गुरुवारी व भुसावळहुन शुक्रवारी नव्हती त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता सदर गाडी नियमित करण्यासाठी संघटनेचे प्रयत्न सुरू होते दि.५ जुलैपासून सदर गाडी रेल्वे प्रशासनाने फक्त नंदुरबार पावेतो ( गाडी क्र.०९०४९/५०) हि साप्ताहिक गाडी सुरू केली परंतु सदर गाडीची मागणी मोठ्या प्रमाणात दोंडाईचा, शिंदखेडा नरडाणे अमळनेर व धरणगाव येथील प्रवाशांची होती तसेच गाडीला प्रवाशी व उत्पन्न देखील संपूर्ण तापी सेक्नवरुनच मिळते परंतु रेल्वे प्रशासनाने सदर गाडी फक्त नंदुरबार पावेतो करुन तापी सेक्शनवरील प्रवाशांची गैरसोय केली आहे तरी सदर गाडी खान्देश एक्स्प्रेस प्रमाणे भुसावळ पावेतो करण्यात यावी तसेच नंदुरबारहुन दुपारी ४ वा.धावणारी बोरीवली गाडी देखील भुसावळ ते बोरीवली मार्गे पुणे पावेतो करण्यात यावी अशी मागणी सातत्याने प्रवाशी संघटना करीत आहे याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने दोंडाईचा शिंदखेडा नरडाणा अमळनेर व धरणगाव येथील प्रवाशी संघटना लवकरच आंदोलन करतील असे निवेदन पश्चिम रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रविण महाजन दोंडाईचा प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष खूर्शिद कादियानी शिंदखेडा प्रवाशी संघटनेचे दादा मराठे नरडाणा प्रवाशी  संघटनेचे सिद्धार्थ सिसोदे अमळनेर प्रवाशी संघटनेचे जेठमल जैन धरणगाव प्रवाशी संघटनेचे महेंद्र कोठारी इ सदस्यांनी केंद्रीय मंत्री मा ना.रक्षा खडसे खा.स्मिता वाघ माजी मंत्री तथा आमदार आ.जयकुमार रावल पश्चिम रेल्वे  प्रशासनाचे मुख्य व्यवस्थापक व्ही सत्यप्रकाश विभागीय व्यवस्थापक निरज वर्मा   इ पदाधिकाऱ्यांना दिले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने