कै.वसंतराव नाईक जयंतीच्या निमित्ताने बांबू लागवडीच्या चौथा वाढदिवस साजरा.



कै.वसंतराव नाईक जयंतीच्या निमित्ताने बांबू लागवडीच्या चौथा वाढदिवस साजरा. 

शिरपूर - दि.01/07/2024 रोजी हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांच्या व शेतकरी दिनाच्या निमित्ताने वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांच्या बांबू वृक्ष लागवडीच्या चौथा वा वाढदिवस शिरपूरचे भाजपचे नेते व नगरसेवक श्री हेमंत भाऊ पाटील व नामांकित चार्टर्ड अकाउंटंट श्री अंकित शेवाळे साहेब यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांनी चार वर्षांपूर्वी 50 एकर क्षेत्रात 33000 विविध प्रकारच्या बांबू वृक्षांची लागवड शेतकरी दिनाच्या निमित्ताने व कै.वसंतराव नाईक जयंतीच्या निमित्ताने औचित्य साधून एक जुलै 2020 रोजी लागवड केली होती व दरवर्षी बांबू लागवडीच्या वाढदिवस साजरा करीत असतात हे त्यांचे चौथे वर्षे आहे. यावेळी भाषणात हेमंत पाटील व अंकित शेवाळे यांनी कै.वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी खूप झटले होते, त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रात हरितक्रांती आणली होती.शिरपूर तालुक्यात जलसंधारणाचे व शैक्षणिक क्षेत्राचे काम महाराष्ट्रात नावलौकिक केलेल आहे तसेच वृक्ष लागवडीमध्ये शिरपूर तालुक्याचे नाव महाराष्ट्रात अव्वल स्थानावर यायला पाहिजे. यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व्हायला पाहिजे. वृक्ष लागवडीसाठी उद्यान पंडित शिवाजी राजपूत यांनी धुळे जिल्ह्यात व शिरपूर तालुक्यात नाव लौकिक केले आहे असे नमूद केले.


वाढदिवस साजरा करण्यामागे खूप महत्त्व आहे बांबू वृक्षा बरोबर आपले आयुष्य व आरोग्य वाढते, लोकांमध्ये वृक्ष व पर्यावरणाविषयी आवड निर्माण व्हावी, मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी,पर्यावरण संतुलनाचे,जल संवर्धनाचे,मृदा संधारणाचे व जैविक विविधेता निर्माण होण्यासाठी बांबू वृक्ष लागवड आवश्यक आहे. बांबूमध्ये रोजगार निर्माण करण्याची मोठी ताकद आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था समृद्धी करण्यासाठी बांबू फार उपयोगी आहे.बांबूपासून सोळाशे उत्पादन बनत असतात. पन्नास वर्षात एका बांबू पासून 600 च्या वर बांबू निघत असतात. बांबू वृक्षाच्या एका बेटापासून त्याच्या आयुष्याच्या पन्नास वर्षात एक लाखाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष उत्पादन मिळणार आहे हा त्यामागील उद्देश आहे.आपण सर्वांनी राष्ट्रहितासाठी व मानव जातीच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणावर बांबू व इतर वृक्षांची लागवड करावी असे आव्हान वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांनीही केले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजन भो रखेड्याचे उपसरपंच प्रशांत शिवाजी राजपूत व देवेसिंग राजपूत यांनी केले. यावेळी चंद्रशेखर राजपूत, विकेश पाटील, दिग्विजय पाटील, भूषण पाटील, मयूर लोणारी,पंकज पाटील, राहुल पाटील, सुनील पाटील व आशुतोष हे उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने