*राणीपूर शाळेत शिक्षक द्या,अन्यथा आंदोलन- बिरसा फायटर्स आक्रमक*
*शाळेत १० पैकी ४ शिक्षक, शिक्षण विभाग झोपेत*
शहादा प्रतिनिधी : जिल्हा परिषद शाळा राणीपूर तालुका शहादा येथील शाळेत रिक्त पदांवर त्वरित शिक्षकांची नेमणूक करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
दिनांक ०५/०३/२०२४ रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांना बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हा परिषद शाळा राणीपूर तालुका शहादा येथे रिक्त पदांवर शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी,म्हणून निवेदन सादर करण्यात आले होते.परंतु सदर शाळेत अद्याप एकही नवीन शिक्षक नियुक्त करण्यात आलेला नाही. यावरून शिक्षणाबाबत शिक्षण विभागाची उदासीनता दिसून येते.या शाळेत ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असून एकुण १० शिक्षकांची मंजूर पदे आहेत. १० पैकी फक्त ४ शिक्षक या शाळेत कार्यरत आहेत.१० शिक्षकांच्या कामांचा अतिरिक्त पदभार ४ शिक्षकांवर टाकण्यात आला आहे.शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.म्हणून जिल्हा परिषद शाळा राणीपूर येथे रिक्त पदांवर त्वरित शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी.हीच नम्र विनंती.अन्यथा विद्यार्थी पालकांसह जिल्हा परिषद नंदूरबार समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शिक्षण विभागास देण्यात आलेला आहे.