व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेकडून निषेध आंदोलन व विविध मागण्यांचे निवेदन




व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेकडून निषेध आंदोलन व विविध मागण्यांचे निवेदन

शिरपूर:- आज राज्यभरात व्हाईस ऑफ मिडीया या पत्रकारांच्या सर्वात मोठ्या संघटना असणाऱ्या संघटनेमार्फत राज्यभरात पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी निषेध आंदोलन करून निवेदन देण्याबाबत आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, आणि धुळे जिल्हा अध्यक्ष भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्यात हे आंदोलन करण्यात आले.


राज्य शासनाकडून राज्यातील पत्रकार व वृत्तपत्र मीडिया,युट्युब,ई-पेपर,लहान मोठे वृतपत्र,टीव्ही चॅनल्स,रेडिओ,इतर चॅनल्स यांना जाहिरातीबाबत मिळणारी सापत्न वागणूक आणि पत्रकारांच्या इतर प्रलंबित मागण्यासंदर्भात "व्हाईस ऑफ मीडिया"  पत्रकार संघटना,शिरपूर शाखेच्या वतीने तालुकाध्यक्ष भिका चव्हाण यांच्या नेतृत्वात गुरुवारी (4 जुलै) रोजी  सकाळी 11: 30 वाजता तहसील कार्यालयात बाहेर शासन विरोधात काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सदर निवेदन प्रभारी निवासी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांनी स्वीकारले.



               शासनाकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांनाही देण्यात याव्यात,न्यूज पोर्टल,न्यूज यूट्यूब चॅनल यांना शासनाच्या यादीवर घेण्यात येऊन त्यांना शासकीय जाहिराती देण्यात याव्यात,शासनाकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांनाही देण्यात याव्यात. टीव्हीमध्ये काम करणाऱ्या स्टींजर,पत्रकारांच्या मानधना संदर्भातला ठोस निर्णय घ्यावा.टीव्हीच्या टीआरपीची जीवघेणी स्पर्धा बंद करण्यात यावी,पत्रकारांच्या मानधनाबाबत ठोस निर्णय घेण्यासंदर्भामध्ये कमिटी स्थापन करावी.आर.एन.आय. कडून नवीन नियमावली नुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात, रेल्वे प्रवासासाठी अधिस्वीकृती धारकांना पुन्हा सवलत सुरू करावी.,२५ वर्ष पूर्ण केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना द्वैवार्षिक तपासणीतून वगळण्यात यावे,२५ वर्ष पूर्ण केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना वर्धापन दिनाची विशेष जाहिरात देण्यात यावी.पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी असणारी कमिटी,तसेच अधिस्वीकृती कमिटी बाबत असणारा जुना जीआर रद्द करून नवीन जीआर तयार करावा, श्रमीक पत्रकारांना राज्य शासनाच्या सेवानिवृत्ती योजनेचा लाभ मिळावा. यांच्यासह आदी मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया’ तर्फे व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार 4 जुलै 2024 रोजी राज्यस्तरीय आंदोलन पुकारले. त्याअनुषंगाने शिरपूर शहर व तालुक्यातील सर्व दैनिक,साप्ताहिक, न्यूज पोर्टल,यूट्यूब चॅनलचे मालक,संपादक,संचालक,शहर व तालुका प्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांनी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेतर्फे पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होत शिरपूर तहसील कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन केले.
         याप्रसंगी तालुकाध्यक्ष भिका चव्हाण,कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर थोरात, महेंद्र खोंडे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेंद्र माळी,महेंद्र जाधव,गणेश जैन, किशोर माळी
इम्रान शेख ,तसेच सचिन पाटील,सुनील साळुंखे,ईश्वर बोरसे,मोहन बोरसे, गोपाल बडगुजर,मोहसीन शेख,जेष्ठ पत्रकार राजेंद्र पाटील,रामदास पुरी, विजयसिंह राजपूत,रवी भावसार, राजू भावसार,दिनकर पवार,पंडित कोळी, जयराज पाटील,अनिल वाघ आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने