धुळे - देवपूर पोलीस स्टेशन भाग-5 गु.र.नं. 188/2024 भादंवि क.379 प्रमाणे दाखल असून सदर गुन्हयात फिर्यादी यांचे घराचे बाहेर ठेवलले सिलींग फॅन, पाण्याची मोटार, कुलरची मोटार, बॅट-या व शिलाई मशिन असे चोरीस गेले होते. सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना पोहेको/ मुकेश वाघ व पोना/ शशीकांत देवरे, नेमणुक स्था.गु.शा. धुळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा संशयित ईसम नामे 1) हरिष ऊर्फ सनी कैलास चौधरी वय-23 रा.विटाभटटी देवपुर धुळे याने त्याचा साथीदार 02) सागर अरुण हटकर रा. प्रशांत कॉलनी धुळे याचे मदतीने केला असुन त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी वरील गुन्हयाची कबुली देवुन खालील वर्णनाचा व किंमतीचा मुददेमाल काढुन दिला .
६०००/- .किं. च्या SRECRA कंपनीच्या इनव्हर्टरच्या एकुण ०२ बॅटरी रु.कि.ची टेक्स्मो कंपनीची ०१ पाण्याची मोटार
३०००/-रु.कि.च्या ०२ कुलरच्या मोटार
१२००/- कुलरची मोटर,
१०,०००/- रु. किंमतीचे एकुण २० सिलींग फैन
१०००/-रु.कि.चे ०१ शिलाई मशिन
२००० रु.कि.ची ०१ LIVGUARD कंपनीची छोटी बॅटरी असा एकुण 23,200/- रुपये किंमतीचा मुददेमाल पोलिसांनी जप्त केला.
अशा प्रकारे देवपूर पोलीस स्टेशन भाग-5 गु.र.नं. 188/2024 भादंवि क.379 हा चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असुन 1) हरिष ऊर्फ सनी कैलास चौधरी वय-23 रा. विटाभटटी देवपुर धुळे 2) सागर अरुण हटकर रा. प्रशांत कॉलनी धुळे अशांना पुढील कारवाईकामी देवपुर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे साहेब, मा.अपर पोलीस अधीक्षक, धुळे श्री. किशोर काळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्रीराम पवार, असई/संजय पाटील, पोहेकॉ संतोष हिरे, मुकेश वाघ, चेतन बोरसे, प्रशांत चौधरी, पंकज खैरमोडे, पोना शशीकांत देवरे, पोकों/जितेंद्र वाघ, हर्षल चौधरी, महेंद्र सपकाळ अशांनी केली आहे.
