मोटर सायकल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखे धुळे कडुन जेरबंद




मोटर सायकल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखे धुळे कडुन जेरबंद

धुळे प्रतिनिधी -दिनांक ०२/०४/२०२४ रोजी तक्रारदार श्री. राजेंद्र रामभाऊ सोनवणे वय ३३ व्यवसाय शेती रा. एकविरा नगर, पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे यांनी तक्रार दिली की, दिनांक ०१/०४/२०२४ रोजी सांयकाळी १७.३० वाजेच्या दरम्यान माझे देशशिरवाडे शिवारातील शेतात लावलेली माझी मालकीची लाल रंगाची बजाज कंपनीची प्लॅटीना मो/सा क्र. एम.एच. १८ बी.जे. २५५९ ही माझे संमती शिवाय लबाडीच्या इरादयाने कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे. त्याबाबत पिंपळनेर पोलीस ठाणे येथे भाग ५ गुरनं १०१/२०२४ भादंवि कलम ३७९ हा मोटर सायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे.

मा.पोलीस अधीक्षक, धुळे यांनी पो.निरी.श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना मोटर सायकल चोरीच्या गुन्हयाची उकल होणे बाबत सुचना देवुन आदेशीत केले होते.

त्याअनुषंगाने माहिती प्राप्त करीत असतांना दिनांक २३/०७/२०२४ रोजी पो.निरी. श्रीराम पवार, यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा एकनाथ हिरामण सोनवणे रा. अजंग वडेल याने त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने केलेला असुन तो त्याच्या साथीदारासह कुसुंबा बस स्टॅन्ड जवळ उभा असल्याची माहिती मिळाल्याने पो.निरी. श्रीराम पवार, यांनी स्थागुशा कडील पथकास तात्काळ रवाना केले. पथकाने कुसुंबा येथे जावुन १) एकनाथ हिरामण सोनवणे वय २९ व्यवसाय शेती रा. मु.पो. अजंग वडेल, ता. मालेगाव जि. नाशिक व २) आधार भारत माळी वय २८ व्यवसाय फोटोग्राफर रा. मु.पो. सावतावाडी वडनेर, ता. मालेगाव जि. नाशिक यांना ताब्यात घेवुन त्यांना वर नमुद गुन्हयाबाबत विचारता त्यांनी सदर गुन्हा त्यांचा साथीदार विशाल पंडीत अहीरे रा. बल्हाणे, याचेसह केला असल्याची कबुली दिली. पथकाने पिंपळनेर येथून ३) विशाल पंडीत अहीरे वय २२ व्यवसाय ट्रॅक्टर ड्रायव्हर रा. मु.पो.बल्हाणे, ता. साक्री जि. धुळे यास ताब्यात घेतले. सदर आरोपीतांना अधिक विश्वासात घेवुन त्यांनी कसुन चौकशी करता त्यांनी धुळे जिल्हयातुन चोरी केलेल्या मोटर सायकली अजंग बडेल व बल्हाणे येथे लपवुन ठेवले असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी जावुन चोरी केलेल्या एकुण १८ मोटर सायकली ताब्यात घेवून त्याबाबत खात्री केली असता धुळे जिल्हयात दाखल असलेले खालील नमुद दाखल गुन्हे उघडकीस आले आहेत.

या मोटर सायकलची एकूण किंमत  ९,१०,०००/- रु. किं.आहे.वर नमुद तिन्ही आरोपीतांकडुन जप्त करण्यात आल्या असून धुळे जिल्हयातील चोरीच्या मोटार सायकलीचे एकुण ७ दाखल गुन्हे उघडकीस आलेले असुन इतर दाखल गुन्हयाची माहिती प्राप्त करणे सुरु आहे.

सदरची कारवाई श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे श्री. किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनि/श्रीकृष्ण पारधी, पोसई/अमरजित मोरे, पोसई/अमित माळी, पोसई/प्रकाश पाटील, असई संजय पाटील, पोहेकॉ संदीप सरग, संतोष हिरे, संदीप पाटील, मायुस सोनवणे, तुषार सुर्यवंशी, प्रकाश सोनार, योगेश जगताप, किशोर पाटील अशांनी केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने