पळासनेर ते चोपडा फाटा दरम्यान महामार्गाची दुरावस्था, रस्ता दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे निवेदन




पळासनेर ते चोपडा फाटा दरम्यान महामार्गाची दुरावस्था, रस्ता दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन 

शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे निवेदन 

शिरपूर प्रतिनिधी -  राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक तीनवर पळासनेर ते चोपडा फाटा यादरम्यान महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून त्या जागी तात्काळ दुरुस्ती करावी अथवा नवीन रस्ता तयार करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा  शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र सुनील पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,
शिरपूर तालुका शिवारातील मोजे पळासनेर ते चोपडा फाटा दरम्यान मुंबई आग्रा महामार्ग क्र.३ वरील रस्त्याची दुर्दशा फारच खराब झाली असून, रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांना फारच कसरतीने ड्रायव्हींग करावी लागत आहे. सध्या पावसाळयाचे दिवस आहेत त्यामुळे पाण्याचे भरलेले खड्डे दिसत नाही, त्यामुळे लहान वाहने रिक्षा, मोटर सायकल अशा वाहन धारकांना फारच जिकरीने वाहन चालवावे लागते. रस्त्यात खड्डे का खड्डयात रस्ता अशा प्रश्न लोका समोर उभा राहीला आहे. पळासनेर ते चोपडा फाटा या दरम्यान मोटर सायकल स्वार बरेच प्रवास करीत असतात, मागिल महिन्यात मोटर सायकलीचे बरेच अपघात झाले त्यामुळे लोकांचा जिव गमवावा लागत असुन काही मोटर सायकल स्वार हे गंभीर जखमी होवुन, त्यांना कायमचे अपंगत्व निर्माण झाले आहे. सदर रस्त्यावर फारच मोठ मोठे सुमारे अर्धा ते एक फुट खोलीचे खड्डे झाल्याने वाहने चालवणेस त्रासाचे झाले आहे.
तसेच सांगवी, पळासनेर येथुन धुळे किंवा शिरपूर येथे वाहनाने आणत असलेल्या पेशंटला देखील जिव गमविण्या सारखे झाले आहे. अपघाती पेशन्ट तसेच इतर आजाराचे पेशंन्ट यांना
तात्काळ धुळे किंवा शिरपूर येथील उप जिल्हा रुग्णालय, शिरपूर, सिव्हील हॉस्पीटल, धुळे किंवा इंदिरा मेमोरियल या ठिकाणी पेशंट आणणे सुध्दा जिकरीचे झाले नाहे. सदर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने पेशंट त्यामुळे गचकला देखील जावु शकतो किंवा तशा पेशंटला खड्यामुळे अॅटक येवुन पेशंट दगावु शकतो तसेच काही ऑफिसीयल कामे, कोर्ट कचेरी वगैरेचे कामासाठी सुध्दा याच रस्त्याने, मोटर सायकलीने किंवा छोटया कार, बोलेरो, जिप वगैरे सारख्या वाहनाने इकडुन वापरता येणे शक्य होत नाही व खड्‌यामुळे बराच वेळ वाहन चालकांचा जातो, त्यामुळे सदर रस्त्याची दुरुस्ती करणे व नवीन रस्ता बनवणे फारच आवश्यकतेचे व गरजेचे झाले आहे.

तरी दहा दिवसात रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा आंदोलनाच्या इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने