पेपर लीक मुद्दा तापला असताना आता डमी विद्यार्थी बसवून तोतयागीरी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शहादा प्रतिनिधी सुमित गिरासे




पेपर लीक मुद्दा तापला असताना आता डमी विद्यार्थी बसवून तोतयागीरी

शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

शहादा प्रतिनिधी सुमित गिरासे 

देशात पेपर लीकचे प्रकरण गाजत असताना व परीक्षा पद्धतीने व्यक्त केला जात असताना शहादातून पुन्हा शैक्षणिक क्षेत्रात डमी विद्यार्थी बसवून परीक्षा दिल्याच्या प्रकार समोर आला आहे. 

या बाबत शहादा पोस्टे फौ. गुरनं. 425/2024 भादवि कलम-416, 419 सह महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व ईतर विनिर्दिष्ठ परिक्षांमध्ये होण या गैर प्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 चे कलम 7 व 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद योगेश मोतीराम सावळे वय 45 वर्ष, व्यवसाय नोकरी (प्रभारी गटशिक्षण अधिकारीपंचायत समिती शहादा, ता. शहादा, जि. नंदुरबार) रा. महाविर नगर, शहादा, ता. शहादा, जि. नंदुरबार यांनी दिले आहे. 

यात आरोपी 1)महेंद्र भिका मोरे  2) गणेश उखा न्हावी  3) प्रियेश महेंद्र शिरसाठ  4) संगिता भगवान सोनवणे  5) अजय भागवत सुरवसे 
 6) रितेश गोटुलाल तावडे  7) अतुल हेमंत ठाकरे 8) दिपिका राजकुमार ठाकरे  9) ईश्वरी वसंत ठाकरे 10) लियांडर भिमसिंग ठाकरे 11) राकेश जाहांगीर ठाकरे 12) सावन इंद्रसिंग ठाकरे  13) विष्णु वसंत ठाकरे 14) योगीराज राजकुमार ठाकरे 15) मुन्नी वण्या वळवी 16) वैशाली गेमा वळवी 17) हर्षल विनोद वळवी  18) अज्ञात 15 डमी परिक्षार्थी सर्वांच्या पत्ता माहीत नाही. यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिं. 19/06/2024 रोजी 11.26 वा. वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शहादा ता. शाहादा, जि. नंदुरबार येथे हा गैरप्रकार करण्यात आला आहे.

तपशिलः- वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी क्रमांक 12 अशांनी आरोपी क्रमांक 3 ते 17 अशांना वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शहादा येथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत मराठी संगणक टंकलेखन परिक्षा जुन 2024 चालु असतांना त्यांना परिक्षेत आरोपी क्र. 18 मधील एकुण 15 डमी परिक्षार्थीना बसवुन घेवुन तोतयेगीरी केली म्हणुन वगैरे मजकुराच्या लेखी फिर्याद वरुन गुन्हा रजि. दाखल करून CCTNS प्रणाली मध्ये फिडींग करुन सदर गुन्ह्याचा खबरी रिपोर्ट अधिकार असणारे मंजि सो, कडेस प्रत पाठविण्याची तजवीज ठेवुन सदर गुन्ह्याची माहीती VHF स्थानकाने वरिष्ठाना कळवुन सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. पोनि.श्री. शिवाजी बुधवंत सो, यांचे आदेशान्वये पोसई श्री. अभिजीत अहिरे सो,यांचेकडेस मुळ कागदपत्र व केस डायरीसह दिला आहे.

या गुन्ह्याच्या तपास पोसई श्री. अभिजीत अहिरे करत असून अद्याप आरोपी अटक झालेले नाहीत.

सतत बाबतीत झालेल्या सर्व गैरप्रकारांच्या शहादा पोलीस ठाण्यामार्फत तपास करण्यात येत आहे मात्र या बातमीने शिक्षण क्षेत्रात अजून एकदा खळबळ माजली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने