विरवाडे येथील विद्याभारती माध्यमिक विद्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना दाखले वाटप.
चोपडा : महाराजस्व अभियानांतर्गत चोपडा तालुक्यातील आडगाव मंडळातील विरवाडे येथील विद्याभारती विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखल्यांचे वाटप करण्यात आले.तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील विद्याभारती माध्यमिक विद्यालयात शासकीय शुल्कात दाखले काढून दिले. दहावीच्या व बारावीच्या परीक्षेनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र,उत्पन्नाचे प्रमाणपत्र आदी दाखल्यांसाठी धावपळ करावी लागते.आवश्यक दाखले शालेयस्तरावर उपलब्ध व्हावेत याबाबत मंडळ अधिकारी व्ही.पी.पाटील यांनी मुख्याध्यापकांना व तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र संचालकांना सूचना दिल्या.
तालुक्यात आडगाव मंडळामध्ये अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.मंडळ अधिकारी व्ही.पी.पाटील यांनी दाखल्यासाठी लागणारे कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले.याप्रसंगी मुख्याध्यापक एस.एल.पाटील,तलाठी दीपाली ईशी,महेंद्र पाटील,श्रीमती.एच.एम पाटील,एम.के.बारेला,कोतवाल तुकाराम बारेला आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.बी.जाधव, यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.