अनधिकृत असलेला सोनगीर टोल बंद करा, शिरपूर टोलनाक्यावर स्थानिकांना टोल माफ द्या या मागणीसाठी शिरपूर फर्स्ट चे प्रांताधिकाऱ्याना निवेदन




अनधिकृत असलेला सोनगीर टोल बंद करा,
शिरपूर टोलनाक्यावर स्थानिकांना टोल माफ द्या 
या मागणीसाठी शिरपूर फर्स्ट चे प्रांताधिकाऱ्याना निवेदन 




       शिरपूर येथील शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून टोल वसुली विरोधात संघर्ष सुरु आहे. विविध पातळीवरील हा संघर्षात दिनांक २४  रोजी प्रांताधिकारी यांना टोलविरोधात निवेदन देण्यात आले.
     निवेदनात म्हटले आहे,शिरपूर ते धुळे जाण्यासाठी वाहनधारकांना २१५ रुपये टोल फक्त ६० किलोमीटरसाठी मोजावा लागतो, ही जनतेची आर्थिक पिळवणूक आहे. प्रशासनाने शिरपूर टोल वर स्थानिक वाहनधारकांना ओळख पत्र दाखवून टोल माफ करावा. तसेच शिरपूर पासून फक्त ३२ किलोमीटरवर असलेला सोनगीर टोल हा अनधिकृत आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील लोकसभेत वक्तव्य केले आहे. तरी हा टोल जनतेकडून पैसा वसूल करत आहे.
     माहितीच्या अधिकारात संघटनेने काही माहिती  मागवली होती. मात्र अनेकवेळा  चुकीचा नंबर दिला गेला वारंवार मागणी केल्यानंतर  प्रोजेक्ट हेड श्री. कृष्णा राव यांचा नंबर दिला गेला.त्यांच्याशी संघटनेच्या प्रतिनिधींनी संपर्क केला तेव्हा त्यांनी अतिशय अर्वाच्च भाषा वापरली. शिवीगाळ केली. याबद्दल त्यांची चौकशी झाली पाहिजे. व त्यांनी जाहीर माफी मागावी. अशी मागणी ही करण्यात आली.
    निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.त्यात शिरपूर टोलला स्थानिक वाहनधारकांना टोल माफ असावा.सोनगीर टोल हा शिरपूर पासून फक्त ३२ किलोमीटरवर आहे हा अनधिकृत टोल शासनाने बंद करावा.
टोल प्रोजेक्ट हेड श्री. कृष्णा राव यांनी अर्वाच्च भाषा वापरल्याने त्यांची चौकशी व्हावी. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.आम्ही या मागण्या घेऊन एन एच ए आय धुळेला निवेदन दिले. टोल नाक्यावर निवेदन दिले पण याची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नाही. त्यामुळे यावेळी शिरपूर फर्स्ट संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे.यावेळी त्यांनी प्रशासनाला सात दिवसात  मागणी मान्य न झाल्यास तापी नदीत जल समाधी घेण्याचा इशारा दिला आहे.
      यावेळी शिरपूर फर्स्ट चे संयोजक हंसराज चौधरी यांनी जोपर्यंत टोल लूट बंद होत नाही. तोपर्यंत हा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला आहे. लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
    या अगोदर शिरपूर फर्स्टने अंकलेश्वर- बऱ्हाणपूर रस्त्याच्या दुरुस्ती करणासाठी आंदोलन केले होते. त्या आंदोलनानंतर प्रशासन जागे होऊन रस्ता दुरुस्ती करण्यात आली होती. त्या आंदोलनाच्या नंतर आता शिरपूर फर्स्ट ने सामान्य लोकांच्या दैनंदिन वापराच्या असलेल्या शिरपूर- धुळे रस्त्यावरील टोलविरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने