रावल नगर दोडाईचा येथील
संत कबीर.यांची ६२५ जयंती मोठ्या उत्साहात साजरी
दोडाईचा (अख्तर शाह)
दोंडाईचा संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संत शिरोमणी कबीर सत्संग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष चेतन शिरसाठ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, अमित दादा पाटील, वंचित बहुजन आघाडीचे मक्कन माणिक, भोजेसिंग रावल. मधुकर चौव्हाण. सौ शोभाताई सिरसाठ. रुपाली चौव्हाण. साक्षी शेवाळे. नंदनी पांडा सौ मिना चौव्हाण. अभिषेक चौव्हाण
आबा चित्ते, मनोज महाजन, संदीप पाटील, सागर शिरसाठ
आदी उपस्थित होते. काळाच्या पुढे
असलेले कवी संत कबीर समाज सुधारक होते. संत कबीर हे सत्य, विज्ञान व कर्मसिद्धान्त वरीला लिखाणामुळे ते संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले. संत कबीर यांनी लिहिलेले दोहे आजही समर्पक वाटतात. असे हे 'कबीर के दोहे' युगानुयुगे विज्ञानवादी शिकवण देऊन सतत जगाला प्रेरणा देत राहतील, असे प्रतिपादन माजी माजी डॉ. हेमंतराव देशमुख यांनी केले.