दरोडा घालण्याच्या होता डाव मात्र पोलिसांनी टाकला घाव
दोन सराईत दरोडेखोर मुद्देमालासह जेरबंद
शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे कामगिरी
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलिसांनी धाडसी कामगिरी करत शहर व परिसरात दरोडा घालण्याचे पुर्वतयारीत असलेले २ गुन्हेगारांना ८५,१००/- रूपयांचे मुद्देमालासह केले जेरबंद आहे.
दि.२४/०६/२०२४ रोजी पहाटे ०४.३० वाजेचे सुमारास शिरपूर शहर पो.स्टे. चे पोउनि/हेमंत खेरणार हे चापोकों/रविंद्र महाले यांचेसह शासकीय वाहनाने रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असतांना शिरपूर शहरातील निमझरी नाका परिसरात दोन मोटार सायकल त्यापेकी एका मो.सा. वर तीन इसम व दुसऱ्या मो.सा.वर दोन इसम असे एकुण ५ इसम संशयीतरित्या फिरतांना दिसुन आल्याने पोउनि/खेरणार यांनी लागलीच शोध पथकाचे अंमलदारांना बोलावुन त्यांचे सोवत वरील संशयीत इसमांचा शोध घेत असतांना त्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटचे पुढे रस्त्यावर एका होंडा कंपनीची शाईन मो.सा. वरील वसलेल्या तिन इसमांपैकी एकाच्या हातात बॅग दिसल्याने त्यांना पकडत असतांना मो.सा. वर मागे बसलेल्या इसमाने मो.सा. वरून उडी मारून पळून गेला. तेव्हा मो.सा. वरील इतर दोघांना जागीच पकडले. त्यानंतर पोउनि/खैरणार यांनी लागलीच शोध पथकाचे अंमलदारांना पळून गेलेल्या तिसऱ्या इसमाचा तसेच दुसऱ्या मो.सा.वरील दोन इसमांचा शोध घेण्यास सांगितले परंतु वरील इसम हे मिळून आले नाहीत. पोउनि/खेरणार यांनी पकडलेल्या दोन इसमांना पंचांसमक्ष त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) राजेंद्रसिंग ऊर्फ राजन प्रितमसिंग बरनाला वय-२६, २) ईश्वरसिंग नुरबिनसिंग चावला वय २३ दोन्ही रा.उमर्टी ता. वरला जि. वडवाणी राज्य-मध्य प्रदेश तसेच घटनास्थळावरून पळून गेलेला ३) शेरसिंग निर्मलसिंग जुनेजा रा.उमटों ता.वरला जि. वडवाणी राज्य-मध्य प्रदेश असे सांगितले. त्यांची अंगझडती व त्यांचेकडील बॅगेची झडती घेतले असता एक मोटरसायकल, मोटर सायकल ला लटकवलेली तलवार, लोखंडी टॅमी, दोन मोठे स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी पोपट पाना, दोन वेगवेगळ्या बॅटरी, धारदार कैचीच्या पात्याच्या दोन भाग त्यांना काळा रंगाची मूठ, मिरची पूड व साहित्य ठेवण्यासाठी वापरण्यात आलेले स्काय बॅग असा दरोडा टाकण्याच्या उद्देशाने सोबत ठेवलेला मुद्देमाल एकूण किंमत 85 हजार 100 रुपये पोलिसांनी जप्त केला.
पकडलेल्या इसमांना विचारपूस करता त्यांनी काहीएक उपयुक्त माहिती न सांगता उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने सदर आरोपी व त्यांचे सोबतचे पळून गेलेले इतर तीन आरोपी हे सदरच्या चीजवस्तूंसह शिरपूर शहरात चोरी, घरफोडी अगर दरोडा घालण्याचे पुर्व तयारीनिशी असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी नामे-१) राजेंद्रसिंग ऊर्फ राजन प्रितमसिंग बरनाला वय-२६, २) ईश्वरसिंग नूरबिनसिंग चावला वय २३ दोन्ही रा.उमर्टी ता. वरला जि. बडवाणी राज्य- मध्य प्रदेश तसेच घटनास्थळावरून पळून गेलेला ३) शेरसिंग निर्मलसिंग जुनेजा रा. उमर्टी ता. वरला जि. वडवाणी राज्य-मध्य प्रदेश व त्याचे सोबतचे दोन अनोळखी इसम अशांविरूध्द पोकॉ/७२७ भटु राजेंद्र साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३९९,४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्यात वरनमुद आरोपीतांना अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोउनि/संदिप दरवडे हे करीत आहेत.
सदर आरोपीतांकडे मिळुन आलेल्या मो.सा. बाबत खात्री करता सदरची मो.सा.हि आरोपीतांनी भुसावळ जि. जळगाव शहरातुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले असुन त्याबाबत भुसावळ शहर पो.स्टे. गुरनं.१२८/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे. तसेच वरील आरोपी हे घरफोडी चोरी करणारे सराईत आरोपी असुन त्यांचेविरूध्द जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भागवत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री.के. के. पाटील, पोउनि/हेमंत खैरणार, संदिप दरवडे, डी.बी. पथकाचे पोहेकॉ/ललीत पाटील, उदय पवार, पोना/रविंद्र आखडमल, पोकों/विनोद आखडमल, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, सुदर्शन मोरे, प्रशांत पवार, भटु साळुंके, आरीफ तडवी, सचिन वाघ, मनोज महाजन व मनोज दाभाडे, चापोका / रविंद्र महाले व चापोहेकों/नासिर खान पठान अशांनी मिळून केली आहे.