चोरीच्या सहा मोटरसायकलीसह एक आरोपी जेरबंद, शिरपुर शहर पो.स्टे. चे डी. बी. पथकाची कामगिरी




चोरीच्या सहा मोटरसायकलीसह एक आरोपी जेरबंद, 

शिरपुर शहर पो.स्टे. चे डी. बी. पथकाची कामगिरी

शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर व धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलीस स्टेशन मोटरसायकली चोरी करणाऱ्या सलाईत गुन्हेगाराला शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने सहा मोटरसायकल सह अटक केली आहे. सदर आरोपीकडून चोरीच्या एकूण सहा मोटरसायकली त्यांची अंदाजीत किंमत रक्कम रुपये चार लाख 40 हजार रुपये हस्तगत केली आहे. त्यामुळे शिरपूर शहर पोलीस स्टेशन व देवपूर पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्हे उघडकिस आले आहेत. 

शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं. ३३५/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्यातील फिर्यादी- राकेश दुरसिंग बरडे वय ३२ व्यवसाय-सेंटींग काम रा. शहापूरा ता. सेधवा जि. बडवाणी राज्य-मध्य प्रदेश ह.मु.पाणी फिल्टर जवळ, वरझडी रोड शिरपूर जि. धुळे यांनी दि.०४/०६/२०२४ रोजी  त्यांची होंडा कंपनीची काळ्या रंगाची शाईन मो.सा.शिरपूर जि. धुळे शहरातील पाटीलवाडा येथील बालाजी मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर हॅण्डल लॉक करून उभी केली ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने चोरून नेले बाबत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होता.

शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांमार्फत वेगाने तपासचक्रे फिरविले असता शोध पथकाचे अंमलदार शिरपूर फाटा जि. धुळे येथे पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना एक संशयीत ईसम नामे-गोपाल देविदास पाटील वय ३८ रा. मोहाडी उपनगर, धुळे जि. धुळे त्याचे ताब्यातील शाईन मो.सा.वर फिरतांना मिळुन आल्याने त्यास विचारपूस करता तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने त्याचे ताब्यातील मो.सा.चे चेचीस नंबर व इंजिन नंबर वरून खात्री करता सदरची मो. सा. हि वरील गुन्ह्यातील चोरीस गेला माल असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचा आरोपी सदर गुन्ह्यात निष्पन्न झाला.

वरनमुद आरोपीतास त्याने शिरपूर जि. धुळे शहरात अगर इतर कोठे कोठे मो.सा. चोरी करण्याचे गुन्हे केले आहेत व चोरी केलेल्या मो.सा. त्याने कोठे व कोणाकडे लपवुन ठेवल्या आहेत किंवा विक्री केलेल्या आहेत याबाबवत त्यास सखोल विचारपूस करता त्याने शिरपूर शहरातुन तसेच देवपूर ता. जि. धुळे व इतर ठिकाणाहुन मो.सा. चोरी केल्याचे कबुल करून चोरी केलेल्या विविध कंपनीच्या इतर ५ मो.सा. त्याने शिरपूर जि. धुळे शहरातील शनि मंदिर परिसरात मोकळ्या जागेत लावलेल्या असल्याचे सांगुन सदरच्या मो.सा. दाखविल्याने त्या हस्तगत करण्यात आल्या  आहेत. त्यामुळे सदर आरोपीकडून चार गुन्ह्यांची उकल झाली असून इतर दोन मोटरसायकलच्या मूळ मालकांच्या शोध पोलीस घेत आहे. 

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री.किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भागवत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली ,शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री.के.के. पाटील, डी. बी. पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील, पोना/रविंद्र आखडमल, पोकों/विनोद आखडमल, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, प्रशांत पवार, भटु साळुंके, आरीफ तडवी, सचिन वाघ, मनोज महाजन व मनोज दाभाडे अशांनी मिळून केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने