शहरातील मेन रोडवरील गाडीतून चोरी करणारा आरोपी शिरपूर शहर पोलिसांच्या ताब्यात शिरपूर शहर डी.बी. पथकाची कामगिरी



शहरातील मेन रोडवरील गाडीतून चोरी करणारा आरोपी  शिरपूर शहर पोलिसांच्या ताब्यात 

शिरपूर शहर डी.बी. पथकाची कामगिरी

शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरातील मेन रोडवरील हॉस्पिटल परिसरातून एका असलेल्या कारमधून चोरी करणाऱ्या आरोपीला शिरपूर शहर शोध पथकाने अटक केली आहे. या गुन्ह्यातील  २५०० रुपये किमतीच्या मोबाईल व 2500 रुपये रक्कम रोख असा एकुण २७,५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून ०१ आरोपी जेरबंद केला आहे.

शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं. ३५७/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्यातील फिर्यादी- धनराज भगवान पवार वय २६ व्यवसाय-ड्रायव्हर रा. मेन रोड, वरला ता. वरला जि. बडवाणी ह.रा. रत्नदिप स्टुडिओ, नायगाव ईस्ट, शिवमंदिर मुंबई यांनी फिर्याद दिली की, दि. २३/०६/२०२४ रोजी रात्री १२.३० ते सकाळी ०६.०० वाजेचे दरम्यान त्यांची वॅगनार कार क्र.एम.एच.४८/सी.बी.४९३९ ही शिरपूर जि. धुळे शहरातील इंदिरा मेमोरियल हॉस्पीटल समोरील रस्त्यावर उभी करून त्यांचेकडील रोख ३,०००/- रूपये व २५,०००/- रूपये किंमतीचा वन प्लस कंपनीचा ग्रे रंगाचा मोबाईल असे ते त्यांचे कारचे डॅशबोर्डचे कप्प्यात ठेवुन कारमध्ये झोपलेले असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे कारचा दरवाजा उघडा असल्याचे व फिर्यादी झोपी गेल्याचे पाहुन कारचे डॅशबोर्डचा कप्पा उघडुन त्यात ठेवलेले ३,०००/-रूपये रोख व २५,०००/- रूपये किंमतीचा वन प्लस मोवाईल फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने चोरून नेले बाबत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे.

शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांमार्फत वेगाने तपासचक्रे फिरविले असता शोध पथकाचे अंमलदारांना इसम नामे-आकाश ऊर्फ रितीक चंदु माळी रा. गवळी वाडा, शिरपूर याने चोरी केल्याबाबत मिळालेल्या माहितीवरून त्यांनी त्यास शिताफीने ताब्यात घेवुन विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन त्याचेकडे २,५००/- रूपये रोख व फिर्यादीत नमुद वर्णनाचा २५,०००/- रूपये किंमतीचा वन प्लस कंपनीचा ग्रे रंगाचा मोबाईल हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भागवत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील, डी. बी. पथकाचे पोहेकों ललीत पाटील, पोना/रविंद्र आखडमल, पोकों/विनोद आखडमल, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, प्रशांत पवार, भटु साळुंके, आरीफ तडवी, सचिन वाघ, मनोज महाजन व मनोज दाभाडे, अशांनी मिळून केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने