वटपौर्णिमेच्या दिवशी डंपरच्या धडके एका सुहासीनेचा मृत्यू... नंदुरबार सुमित गिरासे




वटपौर्णिमेच्या दिवशी डंपरच्या धडके एका सुहासीनेचा मृत्यू...

नंदुरबार सुमित गिरासे

वटपौर्णिमेच्या दिवशी डंपरच्या धडके एका सुहासीनेचा मृत्यू..... महिला गर्भवती असल्याची माहिती.... शहरातील करण चौफुली परिसरात पुन्हा डंपरच्या दडकेत गर्भवती महिलेचा मृत्यू तर पती गंभीर जखमी...... सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 21 जून 2024 शुक्रवार रोजी नंदुरबार शहरा लागत असलेल्या होळ तर्फे हवेली गावातील प्रकाश पाडवी हा इसम पत्नी कवा पाडवी सोबत महिन्याचं किराणा आपली दुचाकी क्रमांक एम एच 39 एच 3116 वर घेऊन जात असताना दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान करण चौफुली जवळ भरधाव वेगातील डंपर क्रमांक एम एच 46 बी एफ 9066 च्या धडकेत दुचाकीचा तोल गेल्याने कवा पाडवी ही गर्भवती महिला डंपरच्या चाकाखाली दाबली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर पती प्रकाश पाडवी हे दुचाकीवरून बाजूला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. अपघात स्थळी बघ्यांची गर्दी जमा झाली होती. लागलीच घटनास्थळी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी नंदुरबार शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होऊन त्यांनी 108 रुग्णवाहिकेला घटनास्थळी प्राचारण केले जखमी प्रकाश पाडवी यांना अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यासोबत मृत कवा पाडवी यांचा शव देखील रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनाकरिता जिल्हा रुग्णालयात पोहोचविण्यात आले. घटनेची माहिती कळतात व तर्फे हवेली गावातील ग्रामस्थ मृत महिलेचे नातेवाईक यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अपघात करून पळालेल्या डंपरला पकडून शहर पोलीस स्टेशन परिसरात जमा करण्यात आले डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने