प्रभू श्रीरामचंद्रांच्या आयोध्येत भाजप चा दारुण पराभव ,जय अयोध्या धाम मोदींचे काम तमाम




प्रभू श्रीरामचंद्रांच्या आयोध्येत भाजप चा दारुण पराभव ,जय अयोध्या धाम मोदींचे काम तमाम 

देशातील लोकसभेच्या निवडणुकांच्या निकाल लागल्यानंतर एन.डी.ए.जरी बहुमत गाठत असली तरी देशातील जनतेने भाजपचा  हिंदुत्वाचा बुरखा टराटरा फाडला आहे. देशात धार्मिक दुहीकरण निर्माण करून प्रभू श्री रामचंद्रांच्या नावाने राजकारण साधण्याच्या प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता खुद्द अयोध्यावासी यांनीच घरच्या रस्ता दाखवला आहे. 

हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे मंदिर व्हावे हे प्रत्येक हिंदूंची इच्छा होतीच. भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने मंदिर झाले हे निर्विवाद सत्य. मात्र आम्हीच प्रभू श्रीरामचंद्रांना बोट धरून आयोध्या मध्ये आणले आणि पुन्हा स्थापित केले, आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या राजकारणासाठी वापर करण्याचा जो केविलवाना प्रयत्न झाला तो लोकांना आवडला नाही. परिणामी प्रभू श्रीरामचंद्रांच्या आयोध्या मध्ये भाजपची राजकीय हार झाली. रामाच्या नगरीतच रामाच्या नावाने राजकारण साधनाऱ्यांच्या रामनाम सत्य जनतेने केला आहे. मी अवतारी पुरुष आहे असे म्हणणाऱ्या मोदींनी जिथे जिथे सभा घेतल्या तिथे तिथे लोकांनी त्यांना नाकारले आणि त्यांचे उमेदवारांना पराभव पत्करावा लागेल. फक्त अयोध्या मध्येच मध्ये नाही तर अयोध्या परिसरातील सर्वच्या सर्व जागा भाजपला गमवावे लागल्या. त्यामुळे वीस वीस कॅमेरे लावून ध्यान साधनेचे ढोंग करणाऱ्या लोकांना अयोध्येने खूप मोठा संदेश दिला आहे.

काही दिवसांपूर्वी आयोध्या नगरीत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य दिव्य असे मंदिर स्थापित करण्यात आले. या मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी एक अनोखे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. मंदिर उद्घाटन कार्यक्रमाकडे  राजकीय इव्हेंट म्हणून याकडे भारतीय जनता पार्टीने पाहिले. विशेष म्हणजे या वेळेस देखील राम मंदिर प्राण प्रतिष्ठान असून देखील संतांनी केलेला विरोध दखल घेण्यासारखा होता. एकंदरीतच राजकारण साधण्यासाठी साधलेले मंदिर उद्घाटनाचे टाइमिंग, अपूर्ण मंदिर उद्घाटनाचे अति घाई, साधू संतांच्या विरोध, मंदिर उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना न दिलेला मान, स्वतःच नरेंद्र मोदी यांनी केंद्रस्थानी राहून केलेली प्राणप्रतिष्ठा, गोदी मीडिया च्या माध्यमातून मांडलेला पॉलिटिकल बाजार यावर त्यावेळी देखील मोठा विवाद झाला होता.

 यावेळी गोदी मीडियाने चाटूकरीचेची परिशिमा गाठत कृत्रिम आणि खोटी राम भक्ती दाखवत , डोक्यावर भस्म लावून रामभक्ती चे कृत्रिम चित्र देशभरात निर्माण केले होते. कुठेतरी मोदी हे रामा पेक्षा देखील मोठे आणि श्रेष्ठ आहेत असे दाखवण्या चा केविलवाना प्रयत्न देखील या देशात झाला होता.

मात्र अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर होत असताना आयोध्या जागतिक आध्यात्मिक आणि तीर्थस्थळ स्थळ म्हणून निर्माण करत असताना येथील स्थानिक नागरिकांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. बाहेरच्या अनेक लोकांनी येऊन अयोध्येमध्ये जमिनी विकत घेतल्या, विस्तारीकरण आणि रस्त्यांची निर्मिती करताना अनेकांचे संसार उध्वस्त झाले, कुणाची व्यवसाय मिळाले कुणाची घर गेले, अपूर्ण कागदपत्र होती म्हणून अनेकांना त्याच्या मोबदला देखील मिळाला नाही. त्यामुळे एकीकडे राम प्रस्थापित होत होते तर आयोध्यातील जनता विस्थापित होत होती. त्याच्या प्रचंड राग जनतेमध्ये होता. आपला राग त्यांनी मतपेटीतून व्यक्त केला आणि भाजपचे उमेदवार लल्लुसिंग यांच्या दारुण पराभव केला. हीच खरी लोकतंत्र ची ताकद आहे.

ज्या राम मंदिर नवीन तिचा नावाने भारतीय जनता पार्टीने देशात आपले ताकद निर्माण केली, राजकीय अस्तित्व निर्माण केले, राम मंदिर चे निर्माण हा भाजप अजिंडा चा प्रमुख भाग होता, याच आयोध्या नगरीच्या आधारे भारतीय जनता पार्टी तीन वेळा केंद्राच्या सत्तेपर्यंत पोहोचली, त्याच आयोध्या मध्ये आता भाजप आणि मोदींना पराभवाची धूळ चारली आहे. फक्त आयोध्या नाहीतर अयोध्येचे आजूबाजूच्या सर्व परिसरात भाजपच्या सुपडा  साफ झाला. राम मंदिर निर्माण करणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष यांच्या मुलगा देखील पराभूत झाला.  नकली रामभक्त यांची नशेची झिंग उतरवली. देशात जितकी गरज मंदिरांची आहे त्यापेक्षा जास्त गरज रोटी कपडा और मकान, महागाई बेरोजगारी, रोजगार, यांची देखील आहे. मात्र याच्या भाजप ला विसर पडला होता, आपण निर्माण केलेल्या कृत्रिम वातावरणात भाजप मतदारांचे अस्तित्व विसरला होता. मात्र दलित, मुस्लिम,शेतकरी,युवा मतांची नाराजी उफाळून आल्याने हे परिवर्तन झाले. टीव्हीवर दिसणारा भारत आणि वास्तविक भारत यात खूप मोठे अंतर होते. त्यामुळे विकासाचे ढोंग करणाऱ्यांच्या बुरखा जनतेने टराटरा फाडला. राम राज्य म्हणजे फक्त मंदिर नाही तर उत्तम ,शिक्षा, उत्तम आरोग्य, रोजगार हमीभाव आणि सुरक्षेची हमी  देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे देशात मंदिर तर हवे मात्र शांती आणि सद्भावना देखील हवी असे या देशातील हिंदूंना देखील वाटते. प्रभू श्रीराम आमचे आराध्य दैवत आहे आणि श्रीरामांच्या विचारांचे रामराज्य यावे असे प्रत्येक हिंदूंना वाटत असते.

या सर्व घटनांच्या परिणाम ज्याप्रमाणे देशभरातील जनतेवर झाला त्याचप्रमाणे अयोध्येतील जनतेवर देखील झाला आणि अयोध्येच्या जनतेने प्रभू श्रीरामचंद्रांच्या भुमितच भाजपच्या दारुण पराभव करत मोदी योगी टीमचे काम तमाम केले आणि मतपेटीतून धार्मिक असहिष्णुता अमान्य करत एकसंघ भारताची निर्मिती करण्यासाठी , खऱ्या अर्थाने भारतात रामराज्य स्थापित करण्यासाठी नवीन क्रांति केली आणि धार्मिक दूहिकरन  करणाऱ्या शक्तींना राजकारण्यातून दूर करण्याच्या प्रयत्न केला आणि लोकशाहीची ताकद दाखवून दिली. या देशात रावणाचे देखील गर्वहरण झाले होते, त्यामुळे तुम्ही जरी स्वतःला अवतारी पुरुष मानत असले तरी तुम्ही एक सामान्य नागरिक आहात, दर पाच वर्षांनी तुम्हाला जनतेच्या न्यायालयात हजेरी द्यायची आहे, आणि या न्यायालयात चुकीला माफी नाही , म्हणून जे झाले ते झाले आता यापुढे सत्तेच्या उन्माद नको नाहीतर ही जनता तुम्हाला देशाच्या राजकारणातून हद्दपार करू शकते याची जाणीव असावी असा संदेश जनतेने या निवडणुकीत दिला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने