शहादा शहरात राष्ट्र गौरव महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंती उत्सव संपन्न
प्रतिनिधी केवल सिंह राजपूत सर
शहादा शहर सह तालुक्यातील तसेच नंदुरबार-दोंडाईचा-शिंदखेडा-शिरपूर-तळोदा-पानसमेल परिसरातील समाज बांधव-ज्येष्ठ मंडळी-समाजातील लोकप्रतिनिधी युवक व तरुण मंडळी शहादा येथे ८ जून रोजी राष्ट्र-गौरव श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी शहरातून काढलेल्या भव्य मिरवणुकीत आपण मोठ्या संख्येने सहभागी होऊन मिरूणूक शांततेत व शिस्तीत पार पाडून एक आदर्श निर्माण केला.समाज बांधवांनी शहादा तालुका राजपूत समाज मंडळ व श्री महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समितीला सहकार्य केल्याबद्दल आपले सर्वांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
शहादा तालुका राजपूत समाज मंडळाचे पदाधिकारी व संचालक श्री महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी-सदस्यांनी मिरवणूक अत्यंत चांगल्या प्रकारे जल्लोष व उत्साहात पार पाडली.शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळून शांततेत पार पाडली सगळ्यांनी खूप मोठे मोलाचे योगदान दिले आहे.एक कर्तव्य व जबाबदारी समजून मिरवणूक पार पाडली आपण सर्व अभिनंदनास पात्र आहात। त्या सगळ्यांचे जाहीर ऋणनिर्देश व आभार व्यक्त करण्यात आले.
शहादा तालुका राजपूत समाज मंडळ
श्री महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरकारी वकील सुवर्णसिह गिरासे होते .पोलीस अधिकारी दता पवार ,पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सारंगखेडा संस्थाचे देवेद्रसिंहजी रावल ,मालपुर संस्थानचे महाविरसिहजी रावल, समाज अध्यक्ष मोहितसिंह राजपूत ,राष्टीय स्वयसेवक संघाचे अजयजी शर्मा, रविद्रसिंह जमादार , के डि गिरासे, साहेब जि प सं विरेद्रसिंह गिरासे , रविद्रसिंह राव ल ,किशोरसिह सिसोदिया , सुभाषसिह सिसोदिया, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा नंदुरबार जिल्हा कार्य अध्यक्ष केवलसिंहजी राजपूत , प्रविण राजपूत ,जि प सं अभिजीत पाटिल. अरविद कुवर ,सुपडू भोई सुनिल गायकवाड़ सुत्रसंचलन संजयसिंह राजपूत यानी केले कोमलसिंह गिरासे जयपाल जाधव राजपूत समाज बांध नागरिक उपस्थिति होते.