राष्ट्र गौरव महाराणा प्रताप सिंह जी यांची जयंती शिरपूर शहरात उत्साहात संपन्न




राष्ट्र गौरव महाराणा प्रताप सिंह जी यांची जयंती शिरपूर शहरात उत्साहात संपन्न 

शिरपूर प्रतिनिधी - हिंदू सूर्य वीर शिरोमणी शूरवीर राष्ट्र गौरव महाराणा प्रताप सिंह जी यांची 484 वी जयंती संपूर्ण क्षत्रिय समाज शिरपूर तालुका यांच्या वतीने शिरपूर शहरात काल दिनांक 9 जून रोजी मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाली. 



याप्रसंगी रात्री बारा वाजता तालुक्यात विविध ठिकाणी महाराणा प्रतापांच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती संपन्न झाली.

जयंतीच्या दिवशी सायंकाळी क्रांतीनगर चौक ते स्वर्गीय इंद्र सिंह भाऊसाहेब मेमोरियल हॉल दादूसिंग कॉलनी पर्यंत भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. यात तरुणाईने मोठा जल्लोष  ढोल वाद्य व डीजेच्या तालावर नृत्य करून जयंतीच्या आनंद घेतला. यावेळी मिरवणूक मार्गात क्रांतीनगर येथे प्रतिमा पूजन करून, राजपूत वाडा येथे देखील नवनिर्मित महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले, यानंतर शहादा रोडवर देखील प्रतिमा पूजन करण्यात आले, मिरवणुकीतील समाज बांधवांसाठी हिंदुत्व प्रतिष्ठान पाटील वाडा यांनी मोफत पाणी व बिस्कीट वाटप करून आपली सेवा दिली.



सदर प्रसंगी कार्यक्रम स्थळी शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भूपेश भाई पटेल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नंदुरबार मुन्ना दादा रावल, जिल्हा परिषद सदस्य नंदुरबार,सोमु भैया राजपूत, झी मीडियाचे जिल्हा प्रमुख प्रशांत परदेशी, मानव एकता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष राजे सुभाष सिंह जमादार, तालुक्याचे लाडके नेतृत्व डॉक्टर जितेंद्र ठाकूर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र सिंह सिसोदिया, कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते जयपाल सिंह गिरासे, नंदुरबार जिल्ह्यातून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित नंदुरबार नगरसेवक मोहितसिंह राजपूत, नंददर्शनचे पिंटू दादा राजपूत, पृथ्वीराज सिंह रावल सारंखेडा, एकनाथ सिंह जमादार,थाळनेर, अंबालाल राजपूत आमोदा,नारायण सिंह चौधरी,वाठोडा, जगत सिंह राजपूत,बोरगाव, सरपंच संग्रामसिंह राजपूत,अहील्यापुर,धुळे येथून कार्यक्रमासाठी उपस्थित  रावसाहेब पैलवान, तेजपाल सिंह गिरासे, शिरपूर तालुक्यातील उपस्थित सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व समाज बांधव व शिरपूर तालुका क्षत्रिय राजपूत समाजाच्या सर्व युवा कार्यकर्ते, व संघटनेचे सदस्य यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.



सुरुवातीस सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते महाराणा प्रताप सिंह जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती करण्यात आली. यानंतर मान्यवरांची पगडी देऊन सन्मान करण्यात आला. 

कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस टुडेचे संपादक रत्नदीप सिसोदिया यांनी केली. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रशांत परदेशी, मुन्ना दादा रावल , रावसाहेब पैहेलवान, राजे सुभाष सिंहजी जमादार यांनी आपले मनोगत व्यक्त करून सामाजिक विषयांवर मंथन केले. व समाज प्रबोधन केले.



यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते जयपाल सिंह गिरासे यांनी आपल्या व्याख्यानातून हिंदू कुलूसुर्य वीर शिरोमणी शूरवीर राष्ट्र गौरव महाराणा प्रताप सिंह यांच्या जीवनपट, जीवनमूल्य, त्याग स्वाभिमान बलिदान, राष्ट्रभक्ती, व कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमान गहाण न ठेवता आत्मसन्मानासाठी व प्रजेच्या रक्षणासाठी ऐतिहासिक असे बलिदान देऊन इतिहासात अमर होणाऱ्या व ज्या इतिहासाची जगाने प्रेरणा घ्यावी असा रक्तरंजित इतिहास आपल्या व्याख्यानातून मांडला. यावेळेस झालेले युद्ध, वापरण्यात आलेली युद्धनीती, तुल्यबळ संख्या बळ असताना देखील शत्रूवर मिळवलेला विजय, शत्रूंच्या महिलांच्या बाबत असलेले उदारतेचे धोरण, महिला सन्मान, समाजातील सर्व घटकांना सामावून घेत चालवलेले सुशासन इत्यादी प्रमुख बाबींवर प्रकाश झोत टाकण्यात आला. आणि आपल्या पूर्वजांच्या रक्तरंजित इतिहास आपल्याला आणि जगाला कसा प्रेरणा देऊन जातो हे त्यांनी आपल्या व्याख्यानातून मांडले. 

राष्ट्र गौरव महाराणा प्रताप सिंह जी यांच्या जीवन चरित्र बाबत माहिती घेत असताना व्याख्याते जयपाल सर यांनी जीवनाची सत्तावीस वर्ष त्यांनी या महापुरुषाचे चरित्र आणि इतिहास समजून घेण्यासाठी घालवले. सर्व ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन अनेक ग्रंथांचे अभ्यास करून इतिहासाचे अवलोकन केले. आणि यानंतर आपल्या शब्दात महाराणा प्रतापांचे शौर्यगाथा त्यांनी आपल्या पुस्तकातून मांडली. राज्यभरात त्यांची इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हणून ओळख आहे. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण शर्मा आणि आकाशवाणी केंद्र धुळे येथील निवेदिका. सौ. पुनम ताई बेडसे यांनी केले व आभार प्रदर्शन अतुल सिसोदिया यांनी केले. या संपूर्ण नियोजनात खजिनदार म्हणून राज सिसोदिया आणि हितेश राजपूत यांनी विशेष परिश्रम घेऊन योगदान दिले. याप्रसंगी अनेक  लोकांनी या कार्यक्रमासाठी मदत केली. सभा मंडपासाठी श्रीराम मंडप, दीपक राजपूत यांनी आपले योगदान दिले.

यावेळी समाजातील युवकांनी एकत्र येऊन कोणत्याही अध्यक्ष व कोणत्याही पद नियुक्त न करता सर्व युवकांच्या समाज संघटन व एकजुटीच्या ताकतीतून एवढा मोठा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला याबद्दल युवकांचे व समाज बांधवांचे आभार व्यक्त करण्यात आले.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने