रोटरी स्कूलमध्ये ढोल ताशांचा गजरात व नृत्याच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांचे स्वागत* दोडाईचा अख्तर शाह




*रोटरी स्कूलमध्ये ढोल ताशांचा गजरात व  नृत्याच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांचे स्वागत*
दोडाईचा अख्तर शाह 

दोंडाईचा येथील श्रीमती बसंतीबाई पाबुदानजी संचेती रोटरी प्री- प्रायमरी इंग्लिश स्कूल व श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी  व स्कूलमध्ये सन 2024- 2025 या शैक्षणिक वर्षारंभी विद्यार्थ्यांना शाळा ही घरासारखी वाटावी व शाळेतला पहिला दिवस  कायमस्वरूपी स्मरणात राहावा म्हणून ढोल ताशाच्या गजरात व नृत्याच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य श्री  श्रुतिरंजन बारिक यांनी सरस्वतीपूजन केले.     
     फुले, फुगे, तोरणे व रांगोळी काढून शालेय परिसर सजविण्यात आला होता. तसेच मनोरंजनात्मक खेळ, 'स्कूल चले हम व सांसों की सरगम गाये सुस्वागतम' या गीतांवर नृत्य सादर करून अनोख्या पद्धतीने स्वागत झाल्याने प्री-प्रायमरी, पहिली व नवागत प्रवेशित विद्यार्थ्यांना त्याचे कुतुहल वाटत होते. त्यांच्या मनातील भीती दूर होऊन शाळेविषयी लळा व आस्था निर्माण झाल्याचे दिसत होते.तसेच इ. 2 री व 10 वीच्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्टीनंतर शाळा आमच्या गुणवत्ता वाढीसाठी सज्ज असल्याने आम्ही ज्ञानग्रहणासाठी तत्पर असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या वर्ग शिक्षकांबरोबर सेल्फी पॉईंटवर फोटो काढणे हे या दिनाचे मुख्य आकर्षण होते.  
     सौ. ललिता गिरासे व सौ. सुवर्णा पाटील यांनी स्वागतपर भाषणात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने ज्ञान संपादन करून उत्तरोत्तर गुणवत्ता वाढवण्याविषयी सांगितले. 
श्री प्राचार्य श्रुतिरंजन बारिक म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नव्या उमेदीने,नव्या उत्साहाने हसतखेळत ज्ञान संपादन करून शैक्षणिक दर्जा वाढवावा व भारताचे कर्तृत्ववान नागरिक बनून आपल्या भारभूमीला बलशाही बनवावे.
   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंचार्ज सौ.बतुल बोहरी, श्री गोपाल ढोले, श्री विक्की बाटुंगे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन सौ. ललिता गिरासे यांनी केले,तर आभार समन्वयक प्रशांत जाधव यांनी मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने