जिथे जिथे श्री रामाचे वास्तव्य होते त्या पवित्र भूमीवर अहंकाराचा पराभव झाला -संजय राऊत




जिथे जिथे श्री रामाचे वास्तव्य होते त्या पवित्र भूमीवर अहंकाराचा पराभव झाला -संजय राऊत 

मुंबई -  प्रभू श्रीराम यांची नगरी अयोध्या मध्ये भाजपच्या दारुण पराभव झाल्यानंतर विरोधकांनी या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीवर कडाडून टीका केली आहे. 

आयटीआय मधील पराभव भाजपलादेखील जिव्हारी लागला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून आयोध्या नगरीतील नागरिकांवर अंधभक्तांकडून आरोपांच्या फेरी झाडल्या गेल्या. 

याच बाबींच्या समाचार घेत असताना शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांनी आता भाजपवर घनाघात करून टीका केली आहे. 

हे ही वाचा...

*परीक्षा पे चर्चा करणारे पंतप्रधान मोदी NEET घोटाळ्यावर गप्प का? काँग्रेस आक्रमक, CBI चौकशीची मागणी*

https://www.nirbhidvichar.com/2024/06/neet-cbi.html

लोकसभा निवडणूकीत भाजपने राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला होता. राम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर प्रचार करत 400 पार चा नारा दिला होता. मात्र ज्या ठिकाणी राम मंदिर बांधले गेले त्या अयोध्येतच भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. अयोध्येत भाजपच्या लल्लू सिंह यांचा समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद यांनी पराभव केला. "अयोध्ये व्यतिरिक्त देशभरात जिथे जिथे रामाचे वास्तव्य होते अशा सर्वच ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे. प्रभू श्रीरामने जसा अहंकारी रावणाचा पराभव केला होता तसाच देशातील जनतेने यांच्या अहंकाराचा पराभव केला आहे", अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेतून केली. यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर निशाणा साधला.

हे ही वाचा....

*मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारला दिली एक महिन्याची डेडलाई*

https://www.nirbhidvichar.com/2024/06/blog-post_58.html

"भाजपने तीस पेक्षा जास्त जागांवर चोरी केलीय. तीस पेक्षा जास्त जागांवर भाजप हरली आहे. मात्र तिथे भाजपने दबाव आणून विजय मिळवला आहे. भाजप हरलीय, मोदी हरलेयत, शहा हरलयेत, वाराणसी, अयोध्या हरले, चित्रकूट, रामेश्वरम, रामटेक, नाशिकमध्ये हरले. जिथे जिथे रामाचे वास्तव्य होते त्या पवित्र भूमीवर अहंकाराचा पराभव झालाय. रावण अहंकारी होता म्हणून प्रभू श्रीरामाने त्यांचा वध केला. आज तोच अहंकार रामाच्या नावावर चालला होता. लोकशाहीत मतपेटीतून जनतेने अहंकाराचा पराभव घडवून आणला आहे. अद्याप ते पूर्णपणे पराजित नाही झालेले नाही त्यामुळे आता ते काम संघाला करावे लागेल. संघाने ठरवलं तर मोदींचं सरकार 15 मिनिटंही सत्तेत राहू शकणार नाही. मोदींच्या अहंकारी सरकारला सुरुंग लावण्याचं काम जर संघ करत असेल तर ते त्यांचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत असं मी मानेन, असं संजय राऊत म्हणाले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने