दादासाहेब रावल जेष्ठ नागरिक संघ दोंडाईचा यांच्या मासिक मेळावा चे आयोजन




दादासाहेब रावल जेष्ठ नागरिक संघ दोंडाईचा यांच्या मासिक मेळावा चे आयोजन 

दोंडाईचा प्रतिनिधी - दादासाहेब रावल जेष्ठ नागरिक संघ दोंडाईचा यांच्या नाशिक मेळाव्याचे आयोजन एक जुलै 2024 सोमवार रोजी सकाळी ,9.30 वाजता ताईसाहेब जमादार सभागृह साने गुरुजी कॉलनी दोंडाईचा जिल्हा धुळे येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राचार्य किमान डॉक्टर एस पी गिरासे यांच्या मार्गदर्शनात संघाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी सर्व सभासद बंधू भगिनींनी उपस्थित रहावे अशी विनंती करण्यात आले आहे.

या मेळाव्यासाठी तज्ञ वक्ते व मार्गदर्शक म्हणून श्री आर सी रामोळे सेवानिवृत्त जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी दोंडाईचा जिल्हा धुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. ते मी पाहिलेला भूतान (प्रवास वर्णन) या विषयावर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत.

सर्व सभासदांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एस पी गिरासे, कोषाध्यक्ष सुरेश एन चौधरी, सचिव सुरेश बी पाटील आणि सर्व पदाधिकारी व कार्यकारणी मंडळ यांनी केले आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने