विजेच्या खांबावरील अल्युमिनियमची तार चोरणाऱ्या दोघां विरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा प्रतिनिधी सुमित गिरासे




विजेच्या खांबावरील अल्युमिनियमची तार चोरणाऱ्या   दोघां विरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा

प्रतिनिधी सुमित गिरासे

शहादा, ता.२७ : शिरूड (ता.) शहादा येथील एका शेतकऱ्याच्या शेतातून परस्पर विजेच्या खांबावरील अल्युमिनियमची तार चोरणाऱ्या   दोघां विरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यात एक मोटारसायकल घेऊन फरार झाला तर दुसऱ्याला पकडण्यात यश आले. (ता.२६) बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

       पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरूड (ता. शहादा) येथील जगदीश ओंकार पाटील यांच्या शिरुड शिवारातील शेत गट नंबर ३०४ मधील शेतात बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संशयित आकाश न्हानकू रामराजे व राज अरुण कोळी (रा. रामी पथारे,ता. शिंदखेडा) हे शेतकरी जगदीश पाटील यांच्या संमतीशिवाय १४ हजार १६० रुपये किमतीची ३००मिटर लांबीची दोन गाळ्यांची ॲल्युमिनियम धातूची इलेक्ट्रिक तार चोरतांना आकाश बारकू रामराजे याला जागीच पकडले.तर दुसरा राज अरुण कोळी हा मोटर सायकल घेऊन फरार झाला असून विनोद संजय चित्ते विद्युत सहाय्यक वीज वितरण कंपनी यांच्या फिर्यादीवरून भारतीय विद्युत कायदा कलम १३६ प्रमाणे शहादा पोलीस ठाण्यात आकाश रामराजे व राज कोळी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.तारसिंग वळवी करीत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने