*कला,क्रीडा व संगणक शिक्षकांना विनाअट समायोजन करा- बिरसा फायटर्सची मागणी*
*शिक्षकांच्या आमरण उपोषणास बिरसा फायटर्सचा पाठिंबा*
शहादा प्रतिनिधी: कला, क्रिडा व संगणक शिक्षकांना विनाअट समायोजन करा,या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, अजित पवार,आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे तहसीलदार शहादा यांच्यामार्फत देण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,संजय भंडारी,अभिजीत जाधव, दारासिंग पावरा,हॅरी पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.कला,क्रीडा व संगणक शिक्षकांना विनाअट समायोजन करणेबाबत मागणीसाठी
कृती समितीचे आझाद मैदान मुंबई येथे दिनांक २७ जून २०२४ पासून आमरण उपोषण सुरू आहे.त्या उपोषणास बिरसा फायटर्स या सामाजिक संघटनेकडून आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये सन २०१८-१९ पासून चार ते पाच वर्ष शासकीय सेवा दिली आहे. परंतु सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शिक्षकांना कामावरून कमी करण्यात आले. कंत्राटी कला, क्रीडा व संगणक शिक्षकांची नियुक्ती गुणवत्ता यादी नुसार झाली असून आजपर्यंत तीन वर्षा ऐवजी चार ते पाच वर्षे शासनात सेवा दिली असतांना सुद्धा चालू शैक्षणिक वर्षी पुनर्नियुक्ती न देता शिक्षकांवर अन्याय करण्यात आला आहे. कला, क्रीडा व संगणक शिक्षक शासकीय सेवेसाठी शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करीत असलेले कर्मचारी आहेत .तसेच कला, क्रीडा व संगणक शिक्षकांची निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती मार्फत सरळसेवा भरतीच्या सर्व नियमानुसार झाली आहे. तेव्हा बाह्यस्रोत भरती बंद करून पूर्वी प्रमाणे नियुक्ती देण्यात यावेत.
२८ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशन येथे कंत्राटी कला, क्रीडा व संगणक शिक्षकांच्या वतीने सत्याग्रही पदयात्रा काढण्यात आली तेव्हा मा. ना. डॉ. श्री. विजयकुमार गावित, आदिवासी विकास मंत्री, महा. राज्य, यांनी कंत्राटी कला, क्रीडा व संगणक शिक्षकांना बाह्यस्रोतातून वगळून सेवेत कायम करणार असे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करावे. आदेश देण्यासंदर्भात वेळोवेळी घोषणा करूनसुद्धा टाळाटाळ करण्यात आली आहे.त्यांच्या मागण्यांची तात्काळ पूर्तता करण्यात यावी.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडूनही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने शासनास दिला आहे.