राजपूत समाजा बदल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्यावर कारवाई करा - शिरपूर तालुका क्षत्रिय राजपूत समाजाचे तहसीलदारांना निवेदन* सोशल मीडियातून हाके यांचा माफीनामा




 *राजपूत समाजा बदल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्यावर कारवाई करा - शिरपूर तालुका क्षत्रिय राजपूत समाजाचे तहसीलदारांना निवेदन*


सोशल मीडियातून हाके यांचा माफीनामा

 


शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील क्षत्रिय राजपूत समाजाच्या वतीने सोलापूर येथील स्वतःला ओबीसी नेता म्हणणारा लक्ष्मण हाके याने राजपूत समाज आरक्षणाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल आज महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना शिरपूर तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. 


निवेदनात म्हटले आहे की लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. हाकेच्या चुकीच्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजपूत समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे यासाठी त्याच्यावर शासकीय स्तरावर आपल्या माध्यमातून तात्काळ  योग्य ती कारवाई करावी. तसे न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी जबादार लक्ष्मण हाके व प्रशासन राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


लक्ष्मण हाकेचे म्हणणे आहे की आम्ही ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी लढा उभारला आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होऊ देणार नाही. यात हाकेने राजपूत भामटा समाज ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्याबाबत व इतर समाज भावना दुखवतील असे वक्तव्य केले.


त्यामुळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला यास प्रशासन जबाबदार असेल या निवेदनातील इशारा देण्यात आला आहे.


निवेदन देतेवेळी रामसिंग उमेदसिंग राजपूत, बोरगांव सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, राष्ट्रीय करणी सेनेचे भरतसिंग राजपूत, विरपाल राजपूत, जातोडा मा सरपंच जयसिंग राणा, धीरज पवार, नितीनसिंह राणा, जयपाल राजपूत, शुभम राजपूत, हर्षदीप राजपूत, अमोल, हरीश, गोरख, बबन व समाज बांधव उपस्थित होते.


त्या वक्तव्याबद्दल लक्ष्मण हाके ची माफी...


सोशल मीडियातून त्यांची वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर क्षत्रिय समाजात स्वयंपाक व्यक्त होत असेल आपल्या वक्तव्याचा निषेध होत आहे याची जाणीव होतास त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप समाजाची जाहीर माफी मागून दिलगिरी व्यक्त केली आहे. 






Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने