**दोंडाईचा येथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ शोभाताई बच्छाव यांनी कार्यकर्त्यांच्या परिश्रमार्थ मानले आभार**
दोडाईचा अख्तर शाह
दोडाईचा येथे कॉग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ शोभा ताई बच्छाव यांनी कार्यकर्त्यांच्या परिश्रम प्रदर्शन सभा घेण्यात आली यावेळेस व्यासपीठावर माजी मंत्री डॉ हेमंतराव देशमुख माजी आमदार रामकृष्ण पाटील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार माजी मंत्री डॉ शोभाताई बच्छाव डॉ हेमंत बच्छाव जिल्हाध्यक्ष श्याम भाऊ समीर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शहाणाभाऊ सोनवणे शैलेश भाऊ सोनार माजी नगराध्यक्ष नानाभाऊ मराठे राष्ट्रवादीचे विठ्ठल सिंग गिरासे रामसिंग अण्णा गिरासे यांना युवा नेते अमित दादा पाटील नाजिम शेख रामी गावाचे माजी सरपंच बापू महाजन शिवसेनेचे कल्याण बागल समाजवादी पार्टीचे उस्मान भाई शेख करणी सेनेचे राजू दादा देशमुख माजी नगरसेवक महेंद्र पाटील रवींद्र जाधव गिरधारीलाल राम राख्या अशोक सोनवणे एडवोकेट रवींद्र मोरे मालपुर गावाचे माजी सरपंच हेमराज पाटील वीरेंद्र गोसावी निंबा पाटील धावडे गावाचे लोकप्रतिनिधी रतिलाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
याप्रसंगी बोलताना ही निवडणूक देशातील सर्वसामान्य नागरिकांची असून विजय निश्चित आहे देशात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे येणाऱ्या विधानसभेत सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने लढाई लढावी लागेल याप्रसंगी माजी मंत्री हेमंतरावजी देशमुख बोलताना म्हणाले शोभाताई बच्छावांच्या विजय निश्चित ताईंनी शिंदखेडा तालुक्यात संपर्क ठेवावा काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत चांगले परिश्रम घेतले म्हणून सर्वांचे आभार त्यांनी मानले याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम दादा सनेर यांनी आपल्या भाषणात आघाडी पक्षाच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करत आपल्याकडे लक्ष दिले जात नाही अशी भावना व्यक्त करत आमची तालुक्यात लढाई वेगळी असून यापुढे जनतेत जाऊ असे त्यांनी आपल्या मनोगतून सांगितले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदलाल बागुल यांनी केले आभार युवा नेते अमित दादा पाटील यांनी मानले