शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वर्धापनदिन अनाथ मुलांना अन्नदान करून साजरा
शिरपूर प्रतिनिधी - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वर्धापन दिवस आज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनाथ मुलांना अन्नदान करून साजरा केला.
आज दि.१९ रोजी शिवसेना पक्षाच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्तसकाळी१०:०० वाजता कै.बापूसो एन.झेड.मराठे विद्यायक संस्था,थाळनेर संचालित अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह,कार्यशाळा व विद्यालय शिरपूर ता.शिरपूर जि.धुळे येथे शिवसेने तर्फे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख भरत सिंग राजपूत, कामगार सेनेचे जिल्हाअध्यक्ष राजू टेलर,उपजिल्हासंघटक विभा भाई जोगरणा, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील,तालुका संघटक योगेश सूर्यवंशी, उपतालुकाप्रमुख अभय भदाणे,पिंटू शिंदे, नाना जाधव,शहर समनव्यक देवेंद्र पाटील,वाजीद मलक,युवासेनेचे जिल्हा समन्वयक अनिकेत बोरसे,तालुका अधिकारी विजय पावरा,शहर अधिकारी बबलू शेख,युवराज पाटील,शरद पाटील जावेद शेख सर्व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.