*रोटरी सिनियर्सचे उद्या दोडांईचात पदग्रहण*
अध्यक्षपदी सौरव अग्रवाल सचिवपदी प्रविण महाजन
दोंडाईचा (मुस्तूफा शाह) ( दि.१८/६/२०२४) दोंडाईचा शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली रोटरी सिनियर्स ह्या संस्थेचे १० वे पदग्रहण समारंभ दि.१९ जुन बुधवार रोजी सायंकाळी ६ वा.रोटरी भवन येथे संपन्न होत आहे रोटरी सिनियर्सच्या नुतन अध्यक्षपदी सौरव अग्रवाल सचिवपदी प्रविण महाजन यांची निवड करण्यात आली असून त्यांचा शपथविधी सोहळा रोटरीचे प्रांतपाल रो.तुषार शाह यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती सरकार साहेब रावल प्रमुख पाहुणेपदी उप प्रांतपाल नितेश सराफ तसेच प्रमुख वक्ते शहादा येथील प्रसिद्ध पारस पापड गृह उद्योग समुहाच्या संचालिका सौ स्मिता कुचेरीया मार्गदर्शन करणार आहेत .
रोटरी सिनियर्सच्या नुतन अध्यक्षपदी सौरव अग्रवाल सचिव प्रविण महाजन कोषाध्यक्षपदी डॉ गणेश खैरनार कार्यकारी सचिवपदी राजेश भंडारी क्लब लर्निग ट्रेनर सुरेश जैन क्लब सर्विस प्रोजेक्ट चेयर राजेश मुणोत क्लब फाऊंडेशन चेयर चेतन सिसोदिया क्लब मेंबरशिप चेयर डॉ राजेंद्र पाटील पब्लिक इमेज चेयर रविंद्र कोटडीया उपाध्यक्ष डॉ अनिल धनगर क्लब यंग लिडरशिप चेयर डॉ अनिकेत पाटील अडँमिनिस्ट्रेशन चेयर डॉ मुकुंद सोहनी लिट्रसी चेयर संजय छाजेड टि आर एफ चेयर जवाहर केसवानी एम एस पी चेयर दिनेश कर्नावट मेन्टल हेल्थ चेयर डॉ सोहनलाल पारख सार्जन्ट कमलेश कांकरिया नुतन अध्यक्ष प्रविण महाजन इन्वारमेंट चेयर केदारनाथ कवडीवाले तसेच आर सी सी रामी पथारे चेयर महेंद्र चोपडा आर सी सी निमगुळ चेयर सौ प्रतिभा ठोंबरे आर सी सी अपंग राऊंड टाऊन चेयर हुसेन विरदेलवाला आर सी सी दोडांईचेकर चेयर डॉ राजेंद्र गुजराथी इ पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांचा शपथविधी मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे .