कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या युवकांनी एकत्र येत स्व खर्चाने केले वृक्षारोपण
शिंदखेडा (वा)
गावासाठी काहीतरी विधायक काम केलं पाहिजे हा विचार घेऊन कामानिमित्त मुंबई ,नाशिक येथे राहत असलेल्या युवकांनी एकत्र येत स्वखर्चाने गावामध्ये पिंपळाचे वडाचे ,निंबाचे आदी 120 पेक्षा जास्त वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले आहे
वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे
सध्या सगळीकडेच तापमानाचे प्रणाम वाढला असून पावसाच्या अनियमितपणामुळे पिण्याचे पाण्याचे स्रोत कमी होत चालले आहे.
अशा पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संतुलन राखून ठेवायचे असेल तर वृक्षारोपन हा सर्वोत्तम उपाय आहे म्हणुन जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मुंबई पोलीस दलातील पोलिस अंमलदार भटू पवार यांना वृक्षारोपण करण्याची कल्पना सुचली त्यानुसार त्यांनी त्यांचे मित्र राजेंश शिरसाठ,दीपक गिरासे, कैलास गिरासे ,बादल गिरासे यांच्यासह त्यांचे ईतर मित्रांनी एकत्र येत पंचवीस हजार रुपयाची वर्गणी जमा करून( परसामळ ता शिंदखेडा)या गावात त्यांनी वडाचे ,पिंपळाचे, निंबाचे ,आदी सुमारे 120 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले त्यात याबाबत त्यांचे गावातील नागरिकांनी कौतुक केले आहे यावेळी दत्तयोगी महाराज ,भाऊसाहेब पाटील ,दीपक पाटील, शशीपाल गिरासे राहुल गिरासे गोकुळ गिरासे सचिन पाटील यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते
चौकट.....
या गावातील युवक हे कामानिमित्त मुंबई नाशिक या ठिकाणी वास्तव्यात आहेत आपण गावाचे काही देणे लागतो हा विचार मनात घेऊनयुवकांनी आतापर्यंत विविध कार्यक्रम राबवले आहेत त्यात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वृक्षारोपण आधी कार्यक्रम ते स्वखर्चाने राबवित असतात
चौकट ......
येथील युवकांनी स्वखर्चाने सुमारे 120 वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आलेले आहे मात्र सदर युवक हे बाहेरगावी राहत असल्याने वृक्षांचे संगोपन देखील करण्याचे गरजेचे आहे येथील ग्रामपंचायतीने निदान यापुढील वृक्षांचे संगोपनाची जबाबदारी घ्यावी अशी माफक अपेक्षा गावातील नागरिकांनी व सदर तरुणांनी केली आहे