अवैध रित्या विना परवाना वाहतूक करून सागवान जातीच्या लाकडपासून वस्तू तयार करणाऱ्या वर वनविभागाची कारवाई शहादा प्रतिनिधी सुमित गिरासे




अवैध रित्या विना परवाना वाहतूक करून सागवान जातीच्या लाकडपासून वस्तू तयार करणाऱ्या वर वनविभागाची कारवाई

शहादा प्रतिनिधी सुमित गिरासे

दि. १३/०६/२०२४ रोजी म. सहा. वनसंरक्षक (रोहयो) अक्राणी स्थित शहादा यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून मौजे सुलवाडे ता. शहादा जि. नंदुरबार राणीपूर वनक्षेत्रातील सुलवाडे या गावातील सुरेश मिस्तरी यांच्या सुलवाडे स्थित राहत्या घरी सर्च वॉरंट जारी करून धाड टाकून तपासणी केली असता. अवैध रित्या विना परवाना वाहतूक करून सागवान जातीच्या लाकडपासून सोफा खुर्ची, तसेच महाराजा पलंग नग ३, तसेच इतर तयार साईज असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अवैध मालाचे मोजमाप घेतले असता एकूण नग संख्या ७४ त्याचे घ. मी ०.७९२ एवढे मोज माप आले असून बाजार भावाप्रमाणे सदर जप्त मुद्देमालाची किमत ९०,०००/- असून विना परवाना अवैध मुद्देमाल चीर काम करून घड तड केल्या मुळे वरील इसमा विरुद्ध वनपाल राणीपूर यांनी वन गुन्हा क्र. ०५/२०२४ दिनांक १३/०६/२०२४ अन्वये वन गुन्हा नोदविला असून सदर कार्यवाही श्री. एस. डी. साळुंके, म. सहा. वनसंरक्षक सो. रोहयो अक्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. एम. बी. चव्हाण वनपरिक्षेत्र तोरणमाळ (प्रा.), श्री ए. पी. मेढे वनपरिक्षेत्र अधिकारी शहादा, श्री. व्ही. पी. मोहिते, वनपाल राणीपूर, श्री. एस. एच पवार, वनपाल तोरणमाळ, श्रीमती. रुपाली मोरे, वनपाल दरा, श्रीमती. प्रियांका बिरारे, वनपाल मंदाना, अनिल तावडे, वनरक्षक तपासणी खेड, नितीन पाटील, वनरक्षक तपासणी नाका शहादा, गुलाब तडवी. वनरक्षक राणीपूर, वाहनचालक श्री. नईम मिर्झा तसेच वाहनचालक श्री. ज्ञानेश्वर पवार यांच्या पथकाने सदरची कार्यवाही केली असून

पुढील कार्यवाही हि श्रीमती. नीनु सोमराज म. वनसंरक्षक सो. धुळे (प्रा.) तसेच श्री. के. बी. भवर, म. उपवनसंरक्षक सो. नंदुरबार (प्रा.) तथा श्री. संजय मोरे, विभागीय वन अधिकारी धुळे (प्रा.) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने