धडगाव तालुक्यातील कात्री येथे खरीप पूर्व शेतकरी मेळावा संपन्न प्रतिनिधी सुमित गिरासे, शहादा




धडगाव तालुक्यातील कात्री येथे खरीप पूर्व शेतकरी मेळावा संपन्न

प्रतिनिधी सुमित गिरासे, शहादा

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील कात्री येथे खरीप पूर्व शेतकरी मेळावा घेण्यात आला कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम (RAD) प्रकल्प राबविण्यात येत आहे .यात निक्रा प्रकल्प अंतर्गत समाविष्ट कात्री गावाचा समावेश करण्यात आला आहे.

कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम (RAD) प्रकल्पाची प्रास्ताविका श्री. प्रमोदसिंग राजपूत( कृषी पर्यवेक्षक ) यांनी केली. 
    मार्गदर्शनपर कार्यक्रमात अध्यस मा. श्री तानाजी खर्डे (उप विभागीय कृषी अधिकारी , शहादा) व मा.श्री. रतीलाल महाले (तालुका कृषी अधिकारी , आक्राणी) यांनी  स्थानिक भाषेत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम (RAD) प्रकल्पाचे सविस्तर मार्गदर्शन व  विविध योजना कृषी यांत्रिकीकरण योजना, फळबाग लागवड योजना, वनीकरण, मूल्यवर्धनासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना आणि कृषी विभागाच्या विविध योजना यांचा लाभ घेण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 
       तसेच कृषी विज्ञान केंद्र , नंदुरबार येथील मा.श्री.जयंत उत्तरवार (शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी) निक्रा प्रकल्पांतर्गत उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती व निक्रा प्रकल्पांतर्गत विविध तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके व माहिती देत गाव स्तरावरील अवजारे बँकेचा वापर वाढवण्यासाठी उपस्थित शेतकऱ्यांना या वेळी आवाहन केले.
   या वेळी श्री.संदीप वळवी (लोकनियुक्त सरपंच, कात्री, ता.धडगाव) यांनी स्थानिक भाषेत शेतकऱ्यांना कोरडवाहू क्षेत्र विकास  प्रकल्प अंतर्गत आपला विकास साधावा, असे आवाहन केले.
   सूत्रसंचालन कात्री गावचे श्री.अरुण कदम (संशोधन सहायक , निक्रा) यांनी केले. या वेळी आधुनिक शेती उपयोगी कृषी अवजारे व बियाणे यांचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन जगदीश पाडवी (कृषी सहायक)व युवा मित्र शेतकरी संस्था श्री. उदयसिंग पडवी (CRP) केले. कार्यक्रमास कात्री गावातील प्रगतीशील शेतकरी, महिला शेतकरी , या वेळी उपस्थित होते.
     आभार प्रदर्शन मा. श्री. एन. डी पाडवी (मंडळ कृषी अधिकारी , धडगाव) यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने