विनापरवाना लाकडाच्या वस्तू तयार करणाऱ्या दुकानावर वनविभागाची धाड
अवैध लाकडा सह रंधा मशीन जप्त करून गुन्हा दाखल
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात वन विभाग अचानक ॲक्शन मोडवर आल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांची धाबे दणाणले आहे. मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे कारवाई करत विनापरवाना बेकायदेशीरपणे सागवान लाकडाची वस्तू तयार करणाऱ्या दुकानावर अचानकपणे धाड टाकून मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक 27/05/2024 रोजी मिळालेल्या गुप्त बातमी वरून मा. श्रीमती निनु सोमराज , वनसंरक्षक प्रादेशिक धुळे , मा.श्री नितीन कुमार सिंग , उपवनसंरक्षक धुळे वनविभाग धुळे, व मा. श्री राजेंद्र सदगीर, विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे. म.सहय. वनसंरक्षक शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्र शिरपूर प्रादेशिक ,परिमंडळ सुळे निंयतक्षेत्र दहिवद बिटातील महसूल क्षेत्रात शिरपूर इंदूर हायवे लगत रस्त्यावर दुपारी 03.15 वाजेच्या सुमारास किरण फर्निचर , येथे वरील गुप्त बातमी वरून तपासणीसाठी गेलो असता .विना परवाना 12 इंच रंदा मशीन, कटर मशीन सागवान जुने मालापासून तयार केलेले दरवाजे, चौकटी व इतर कट साईझ सागवान मुद्देमाल 1.360 घ.मी मिळून आला. याबाबत वन गुन्हा नोंदविण्यात आला. 12 इंच रंदा मशीन व सागवान मुद्देमाल किंमत. 40,000 रुपये एवढी सदरील मुद्देमाल रेंज कार्यालय शिरपूर येथे जमा केले. पुढील तपास वनपाल सुळे करीत आहेत.सदरची कार्यवाही भारतीय वन अधिनियम 1927 42 , व महाराष्ट्र वन नियमावली 2014 कलम 53 (10) अन्वये करण्यात आली.
सदरची कारवाई मा.श्री के डी देवरे वनक्षेत्रपाल शिरपूर आर .ई पाटील वनपाल रोहिणी, दीपिका पालवे वनपाल सुळे , भारती राजपूत वनपाल वाडी,मनोज पाटील वनरक्षक सुळे, कृष्णकांत साळुंखे वनरक्षक दहिवद, ज्योतिबा कांदे वनरक्षक भोईटी ,राहुल देसले वनरक्षक निमझरी, विजय शिंदे वनरक्षक हिसाळे, सोनल मगरे वनरक्षक लाकड्या हनुमान, भारती पावरा वनरक्षक लौकी, व वनंमजुर इत्यादी वन ,अधिकारी व कर्मचारी यांच्या समूहाने सदरील कारवाई यशस्वीरित्या केली. पुढील तपास चालू आहे.