शिरपूरला खरीप हंगाम पूर्व तालुकास्तरीय कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे प्रशिक्षण संपन्न
थाळनेर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जिल्हा परिषद,धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे खरीप हंगाम पूर्व तालुकास्तरीय प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले.
या प्रशिक्षण शिबिराच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी बापू गावित होते. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील, धुळे जिल्हा परिषद चे मोहीम अधिकारी प्रदीप निकम, धुळे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हेमंत चौधरी, सचिव भूपेश अग्रवाल, शिरपूरचे तालुका कृषी अधिकारी संजय पवार, शिरपूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजेश चौधरी आदी होते.
यावेळी मोहीम अधिकारी प्रदीप निकम यांनी खत नियंत्रण कायद्यातील महत्त्वपूर्ण तरतुदी बाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले , तसेच धुळे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी बियाण्यांचे कायद्यातील महत्त्वपूर्ण तरतुदी व नव्याने समावेश झालेल्या बाबींवर मार्गदर्शन केले, तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी गुण नियंत्रण निरीक्षकांची कर्तव्य व अधिकार, तसेच कृषी निविष्ठा विक्रेतांनी कोणत्या बाबी करू नये आणि त्यामुळे कायद्याचे उल्लंघन कसे होतें या बाबीवर सविस्तर असे मार्गदर्शन केले , कृषी अधिकारी राजेश चौधरी यांनी कृषी निविष्ठा विक्री करताना कोणकोणत्या महत्वपूर्ण दस्तऐवज ठेवणे अपेक्षित आहे बाबत माहिती दिली.नाशिक विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील यांनी शेतकऱ्यांना बियाणे व रासायनिक खते ही छापील किमतीपेक्षा जादा भावाने विक्री केल्यास, बियाणे व खतांचा काळाबाजार करणाऱ्या संबंधित कृषी निविष्ठा विक्रेत्या विरुद्ध कायदेशीर कडक करावी करण्यात येईल अशी तंबी दिली. कृषी विक्रेत्या संघटनेचे तालुकाध्यक्ष हेमंत चौधरी यांनी रासायनिक खत कंपन्यांकडून होणाऱ्या लिंकिंगबाबत व दोंडाईचा रॅक पॉइंटवरून एक्स चा नीम युरीया छापील किमतीपेक्षा जास्त दराने येत असल्याची तक्रार केली. तसेच एका कृषी निविष्ठा विक्रेत्याने RCF या रासायनिक खत कंपनी कडून होणाऱ्या अलवणूक व पुरवठ्याबाबत लेखी तक्रार दिली.
यावेळी तालुका उपाध्यक्ष गौरव अग्रवाल,योगेश भंडारी, गोपाल जाधव, राजेश पगारे, शैलेंद्र अग्रवाल, संजय पाटील,आशिष अग्रवाल,लक्ष्मण पाटील, मंगेश भदाणे जितेंद्र पाटील, ललित जाधव, नागराज पाटील, जितेंद्र संचेती, नामदेव धनगर, जगदीश पाटील, संजय अग्रवाल, शिरीष महाले आदी उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमास तालुक्यातील १३२ कृषी निविष्ठा विक्रेते व घाऊक विक्रेते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक दीपक पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी विशाल मोटे यांनी केले.