शिरपुर तालुका पोलीस ठाणे व वनविभाग शिरपुर पथकाची अवैध गांजावर संयुक्तिक कारवाई




शिरपुर तालुका पोलीस ठाणे व वनविभाग शिरपुर पथकाची अवैध गांजावर संयुक्तिक कारवाई


शिरपूर - शिरपुर तालुका पोलीस ठाणे व वनविभाग शिरपुर पथकाची अवैध गांजावर संयुक्तिक कारवाई केली आहे.

 दिनांक 04/05/2024 रोजी शिरपुर तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्रीराम पवार व वनविभाग शिरपुरचे वनक्षेत्रपाल श्री. काशीनाथ धुडकु देवरे अशांचे पथक आगामी लोकसभा निवडणुक -2024 चे अनुषगांने वनक्षेत्रात अंमली पदार्थाची माहिती काढून कारवाई करणे करीता गस्तीत असतांना गोपनीय बातमी मिळाली की, कोणीतरी अज्ञात इसमाने मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवुन आणणारा सुकलेला गांजा लहान मोठ्या गोण्यांमध्ये भरुन विक्री करण्याच्या उददेशाने लाकड्या हनुमान शिवारातील आसरापाणी नाल्यात साठवुन ठेवला आहे अशी बातमी मिळाल्यावरुन शिरपुर तालुका पोलीस ठाणेचे पथक व वनविभागाचे पथकाने लाकडया हनुमान शिवारातील आसरापाणी नाल्यात छापा टाकुन 17,80,000/- रुपये किंमतीचा सुकलेला गांजा (कोरडा) जप्त केला असून अज्ञात इसमाविरुध्द एन.डी.पी.एस. कायदा कलम 20 व 22 प्रमाणे पोहेको / सागर खंडु ठाकुर नेमणुक शिरपुर तालुका पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली असुन सदर गुन्हयाचा तपास पोसई कृष्णा पाटील हे करीत आहे.

सदर कारवाई मा. श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक, धुळे श्री. किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक, धुळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोसई/कृष्णा पाटील पोसई/बाळासाहेब वाघ असई रफिक मुल्ला, असई कैलास जाधव, पोहेकों/ संतोष पाटील, पोहेकॉ/ पवन गवळी, पोहेकॉ/ खसावद, पोहेकी/ दिनेश सोनवणे, पोकों/ भुषण पाटील, पोकों/ वाला पुरोहित, पोकों/  रणजित वळवी, पोकों/ स्वप्नील बांगर, पोकों/ प्रकाश भिल, चापोकों, मनोज पाटील, चापोकों/ सागर कासार,
वन विभाग शिरपुर पथक,वनक्षेत्रपाल श्री. काशीनाथ धुडकु देवरे शिरपुर प्रादेशिक, वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष रमेश जाधव गस्तीपथक, वनविभाग धुळे राजेंद्र एकनाथ पाटील वनपाल रोहिणी, कपील पंढरीनाथ पाटील वनपाल, हिसाळे, राहुल अरुण देसले वनरक्षक व ज्योतीबा बालाजी कांड वनरक्षक, दिपीका मधुकर पालवे वनपाल, सुळे, भारती प्रकाश राजपुत वनपाल, वाडी, सुरेश गेंदा जाधव वनपाल गस्तीपथक, धुळे, कृष्णाकांत ईश्वरचंद्र साळुंखे वनरक्षक, दहिवद, मनोज शालीग्राम पाटील वनरक्षक, सुळे, विजय शंकर पाटील वनरक्षक हिसाळे, भारती दारासिंग पावरा वनरक्षक, लौकी, बन्सी पाटील नेमणुक पोलीस मुख्यालय, कर्तव्य वनविभाग, धुळे, डी. डी. अहिरे वाहन चालक, धुळे यांनी केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने