महायुतीचे उमेदवार डॉ. हिनाताई गावित यांना भरघोस मताधिक्याने विजयी करा - माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांचे आवाहन



महायुतीचे उमेदवार डॉ. हिनाताई गावित यांना भरघोस मताधिक्याने विजयी करा - माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांचे आवाहन

शिरपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जनतेसाठी खूप महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी आपण सर्वांनी डॉ. हिनाताई गावित यांना भरघोस मताधिक्याने विजयी करायचे आहे. मोदीजी यांनी लाखो लोकांना असंख्य योजना दिल्या. मोदी सरकार सर्वसामान्यांसाठी काम करतेय. ते कोणत्याही परिस्थितीत आरक्षण काढणार नाहीत, गोरगरीबांचे सरकार आहे. मोदी सरकारने आरक्षण काढले तर मी आत्महत्या करेन. कोणीही चिंता करु नये, अफवांना बळी पडू नका. भाजपा सरकार कडून शिरपूर तालुक्यासाठी कोटयवधी रुपयांचा निधी आपण आणला. भाजपा शिवाय आपली प्रगती होणार नाही. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे माझे मणके शस्त्रक्रिया झाली, डॉक्टरने आराम करण्याचा सल्ला दिलेला असतांना देखील मी आपल्या समोर प्रचारासाठी आलोय. गेल्या 35 वर्षात आदिवासी, दुर्गम भागात, रात्री उशिरा पर्यंत भेटी देऊन मी विकासकामे केली. अहोरात्र मनापासून कामे केली. मी संपूर्ण आयुष्य शिरपूर तालुक्यासाठी व्यतीत केले आहे. हजारो आदिवासी बांधवांना वन जमिनी पट्टे मिळवून दिले. शेतकरी बांधवांसाठी रात्र दिवस काम करतोय. शेतकरी सुखी सर्व सुखी. शिरपूर पॅटर्न अंतर्गत 380 बंधारे केले. हजारो बेरोजगारांना आतापर्यंत नोकऱ्या दिल्या. शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल करुन काम केले. 1 हजार बेड चे अत्याधुनिक हॉस्पिटल निर्माण करतोय. आतापर्यंत अडीच लाख लाभार्थ्यांना शिरपूर आमदार कार्यालय मार्फत लाभ मिळवून दिला आहे. मी कोणाचेही आजपर्यंत नुकसान केले नाही, शिरपूर तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळवून देणार, महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी अनेक दिवस पाणी मिळत नाही, शिरपूर मध्ये पाण्याची मुबलक व्यवस्था केली आहे असे माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल म्हणाले.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ पंचवार्षिक निवडणूक भाजपा व शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), मनसे, आरपीआय (आठवले, कवाडे, खरात गट), रासप-रयत क्रांती, महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. हिनाताई गावित यांच्या प्रचारार्थ 5 मे 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता जनक विला निवासस्थानी रोहिणी, सांगवी, दहिवद या तिन जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार यांच्याशी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी नमो संवाद साधत निवडणूकीत रंगत आणली.


यावेळी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख तुषार रंधे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल, के.डी.पाटील, निलेश गरुड, कन्हैया चौधरी, मनोज धनगर, सत्तरसिंग पावरा, कैलास पावरा, सुक्राम पावरा, योगेश बादल, गिलदार पावरा, कन्हैयालाल पावरा, दिनेश पावरा, प्रल्हाद पाटील, अशोक गायकवाड, कान्हा चारण, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आ. काशिराम दादा पावरा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केंद्र सरकार नमार्फत हजारो योजना राबविल्या. भाई व आम्ही आमदार कार्यालय विकास योजना आपल्या दारी अभियान अंतर्गत नियमितपणे लाखो गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.

माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, शिरपूर तालुक्याने पटेल परिवारावर गेल्या 40 वर्षात खूप उपकार केले आहेत. आई वडिलांनी आमच्यावर संस्कार केल्याने आम्ही आमचे कुटुंबीयशिरपूर तालुक्याची सेवा करत राहणार. शहर व तालुक्यात प्रतिकूल परिस्थिती होती, भाईंनी खूप मेहनत घेतली. शिरपूर तालुकाच हा आपला सर्वांचा पक्ष आहे. आपण भाजपालाच मतदान करायचे आहे. आम्ही सर्वांसाठी मनापासून काम करतोय, गरजू व गोरगरीब साठी 1 हजार बेड चे हॉस्पिटल उभारतोय. आरक्षण जाणार नाही, भाई अजून 20 हजार युवकांना नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रास्ताविक व सूत्रसंचलन सुभाष कुलकर्णी यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने